घरक्रीडासलामीवीर रोहित शर्मावर लक्ष!

सलामीवीर रोहित शर्मावर लक्ष!

Subscribe

द. आफ्रिका-अध्यक्षीय संघ सराव सामना आजपासून

दक्षिण आफ्रिका आणि अध्यक्षीय संघ या संघांमधील तीन दिवसीय सराव सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून होणार्‍या कसोटी मालिकेत रोहित भारताच्या डावाची सुरुवात करणार आहे. रोहित याआधी कधीही कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळलेला नाही. त्यामुळे या सराव सामन्यात सलामीला येताना चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने रोहित मैदानात उतरेल.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना रोहितने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही. त्याने २७ सामन्यांत ३९.६२ च्या सरासरीने धावा केल्या असून यात केवळ ३ शतकांचा समावेश आहे. त्यातच अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी या मधल्या फळीतील फलंदाजांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. मात्र, रोहितसारख्या खेळाडूला संघाबाहेर ठेवणे अवघड असल्याने संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने त्याला कसोटीतही सलामीवीर खेळवण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

सराव सामन्यात त्याला मयांक अगरवालसह खेळण्याची संधी मिळणार आहे. या दोघांचे कसोटी मालिकेआधी फॉर्मात येण्याचे लक्ष्य असेल. तसेच वेगवान गोलंदाज उमेश यादवही सराव सामन्यात खेळणार आहे. उमेशची कसोटी मालिकेसाठीच्या मूळ संघात निवड झाली नव्हती. परंतु, जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघात कर्णधार फॅफ डू प्लेसिसचे पुनरागमन झाले आहे. त्याची टी-२० संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे या सामन्यात खेळपट्टीवर जास्तीतजास्त वेळ घालवण्याचा तो प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघात कागिसो रबाडा, व्हर्नोन फिलँडर आणि लुंगी इंगिडी या उत्कृष्ट गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे रोहितसह इतर फलंदाजांना धावा करण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

- Advertisement -

अध्यक्षीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अगरवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, केएस भरत (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, धर्मेंद्रसिंह जाडेजा, आवेश खान, ईशान पोरेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव

द.आफ्रिका संघ : फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बवूमा, थानीस डी ब्रून, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डीन एल्गर, झुबैर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनूरन मुथुसामी, लुंगी इंगिडी, एन्रिच नॉर्टजे, व्हर्नोन फिलँडर, डीन पायेड, कागिसो रबाडा, हेन्रिक क्लासन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -