घरक्रीडाभारतीय खेळांच्या बदलत्या रुपाबद्दल काय म्हणतेय सिंधू ?

भारतीय खेळांच्या बदलत्या रुपाबद्दल काय म्हणतेय सिंधू ?

Subscribe

आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळांमध्ये खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक खेळाडू चांगली कामगिरी देखील करत आहे. खेळाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन पाहता पी. व्ही. सिंधूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

खेळाला करिअर म्हणून निवडणारे अगदी हातांच्या बोटावर मोजणारी आहेत. पण हल्ली खेळांकडे करिअरच्या दृष्टिने पाहिले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळांमध्ये खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक खेळाडू चांगली कामगिरी देखील करत आहे. खेळाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन पाहता पी. व्ही. सिंधूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

व्हिडिओतून व्यक्त केली भावना

पीव्ही सिंधूने यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात ती खेळांविषयी बोलत असून करिअर म्हणून खेळाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. पालक आता विद्यार्थ्यांना खेळ करिअर म्हणून निवडण्यास परवानगी देत आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवे उपक्रम राबविले. हा व्हिडिओ शेअर करत तिने पंतप्रधानांना टॅग केले आहे.

- Advertisement -

खेळाला अच्छे दिन

पूर्वी करिअर म्हणून खेळाची निवड केली जात नव्हती. तर खेळ फक्त वेळ घालवण्यासाठी किंवा करिक्युलर अॅक्टिव्हिटी म्हणून पाहिले जायचे. पण आता मात्र खेळाला अच्छे दिन आहेत. नरेंद्र मोदी यांनी खेळासंदर्भात अनेक नवीन धोरणं राबवली.त्यामुळेच अनेकजण खेळाकडे वळताना दिसत आहेत. विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांकडे लोक अधिक वळत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -