घरक्रीडापॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नाशिकला ११ पदके

पॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : नाशिकला ११ पदके

Subscribe

पुण्याच्या दिव्यांग क्रिकेट असोसिएशन आणि पुणे महापालिका क्रीडा विभागातर्फे राज्य पॅरा-अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने झालेल्या पॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या खेळाडूंनी ११ पदके पटकावली. यात एका सुवर्णपदकासह तीन रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश होता.

स्वारगेट, पुणे येथील बाबुराव सनद मैदानावर झालेल्या या स्पर्धेत नाशिकच्या १५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी दयावान जाधव (सुवर्ण आणि कांस्य), बाबाजी न्याहारकर, सुनीता भोये, जना टोपले, खंडू कोटकर, राहुल नांदूरकर, प्रदीप देवकर या सात खेळाडूंना पदके मिळवण्यात यश आले.

- Advertisement -

जागृती बनथिया, मेथू पाडवी, बाबाजी कमानकर, मदन चिखले, हरिदास सातपुते, झाकिर तांबोळी, मारुती झिटे, कांतिलाल भोये या खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली, पण त्यांना पदके मिळवता आली नाहीत. पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पुरी, दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षा सायली पोंक्षे, पॅरा-अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण उघडे, मुजावर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -