घरक्रीडाआता 'या' फ्रेंच फुटबॉलरने केली सामन्याची रक्कम दान!

आता ‘या’ फ्रेंच फुटबॉलरने केली सामन्याची रक्कम दान!

Subscribe

थायलंडमधल्या गुहेत वाचलेल्या मुलांना फ्रेंच फुटबॉल स्टार पॉल पोग्बा उपांत्य फेरीतील पुरस्काराची सर्व रक्कम दान करणार आहे.

फिफा विश्वचषकाच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये फ्रान्सने बेल्जियमला १-० ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. फ्रान्सच्या संपूर्ण संघाने अप्रतिम खेळ दाखवत सामन्यात विजय मिळवला. फ्रान्स संघाचा स्टार फुटबॉलपटू पॉल पोग्बा सेमी फायनल सामन्यात जिंकलेली सर्व रक्कम ही थायलंडमधल्या गुहेत वाचलेल्या मुलांना दान करणार असल्याचे जाहीर केले आहे. पोग्बाने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर एका पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे.


फ्रान्सविरूद्ध बेल्जियम हा सेमी फायनलचा सामना सुरूवातीपासूनच अत्यंत चुरशीचा झाला. फ्रान्सने १-० च्या फरकाने बेल्जियमवर विजय मिळवला. ५१ व्या मिनिटाला फ्रान्सचा डिफेन्डर उमटिटी याने केलेला गोल स्पर्धेत निर्णायक ठरला. विशेष म्हणजे फ्रान्स गेल्या २० वर्षांत तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. फ्रान्सच्या आतापर्यंतच्या विजयात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या पोग्बाने आपली सर्व विजयाची रक्कम थायलंडमधल्या गुहेत वाचलेल्या मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलन एमबापेने आपल्या प्रत्येक मॅचनंतर तब्बल १६ लाख रूपये दान केले आहेत. त्यामुळे आता आणखी एका फ्रेंच खेळाडूकडून दाखवण्यात आलेल्या या संवेदनशीलतेमुळे फुटबॉल जगतात फ्रान्स संघाची फॅन-फॉलोविंग झपाट्याने वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

वाचा- ‘हा’ खेळाडू करतो प्रत्येक मॅचनंतर १६ लाखांचे दान

थायलंडच्या गुहेत नेमके काय घडले?

थायलंडच्या ‘लुआँ नांग नोन’ या गुहेमध्ये फुटबॉल कोच एकापोल चॉंटावोंग आपल्या १२ विद्यार्थ्यांसह एका प्रॅक्टिस मॅचनंतर कुतुहलापोटी गेले होते. मात्र मुसळधार पावसाने गुहेतील पाण्याचा स्तर वाढला आणि सगळे जण गुहेतच अडकले. अखेर थायलंडच्या नौदल पथकाच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांची मंगळवारी सुखरूप सुटका करण्यात आली. या गुहेतून बाहेर काढण्यात येणाऱ्या मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक दिवसांपासून ते गुहेत राहिल्यामुळे त्यांना कोणत्या रोगाची लागण तर झाली नाही ना? याची डॉक्टरांनी तपासणी देखील केली. तसेच त्यांना एखाद्या रोगाची लागण झाली असल्यास त्याचा प्रसार होऊ नये, याकरता त्यांना इतरांपासून काही काळ दूर ठेवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -