घरक्रीडावानखेडेवरील IPL सामन्यांवर संक्रांत, राज्य सरकारची MCA ला नोटीस

वानखेडेवरील IPL सामन्यांवर संक्रांत, राज्य सरकारची MCA ला नोटीस

Subscribe

१२० कोटी रूपये द्या नाहीतर वानखेडे स्टेडियम खाली करा, असा निर्वाणीचा इशारा राज्यसरकार कडून देण्यात आला आहे

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमधील वानखेडे स्टेडियम वापराबाबतचा करार संपुष्टात आला असून, स्टेडियमचा वापर सुरु ठेवण्यासाठी सरकारने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे १२० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या केलेल्या मागणीची नोटीस देखील पाठवली होती. त्यामुळे आयपीएलच्या असणाऱ्या पुढील सामन्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयपीएलचे बरेच सामने वानखेडे स्टेडियम मुंबईमध्ये पार पडत असतात. परंतु, आता वानखेडेवरील IPL सामन्यांवर संक्रांत येईल की काय? अशा शंका वर्तवण्यात येत आहे.

१२० कोटी रुपयांची मागणी

करार नुतनीकरण, थकीत कर आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी एमसीएला राज्य सरकारने नोटीस पाठविली आहे. ही नोटीस १६ एप्रिलला मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आली आहे. यामध्ये एमसीएकडून १२० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जर ही रक्कम देण्यात आली नाही तर एमसीएला हा परिसर रिकामा करावा लागणार असून परिसर वापरता येणार नाही . १२० कोटी रूपये द्या नाहीतर वानखेडे स्टेडियम खाली करा, असा निर्वाणीचा इशारा राज्यसरकार कडून देण्यात आला आहे. याकरिता ३ मे पर्यंतची तारीख देण्यात आली आहे.

- Advertisement -

एमसीएचा ५० वर्षांचा होता करार

राजकीय नेते एस के वानखेडे यांनी हे स्टेडियम १९७५ मध्ये बनविले होते. त्यावेळी त्यांचे असे म्हणणे होते की, मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे त्यांचे स्वत:चे स्टेडिअम असायला हवे. यावरून क्रिकेट क्लब ऑफ इंडायसोबतही खटके उडाले होते. ४३,९७७.९३ चौ. मी मध्ये असलेल्या या स्टेडियममध्ये ३३ हजार प्रेक्षक एकाचवेळी बसू शकतात. राज्य सरकारने ही जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनला ५० वर्षांच्या करारावर दिली होती. हा करार गेल्यावर्षीच्या फेब्रुवारमध्येच संपला आहे.

- Advertisement -

अशी आहे नोटीस

या करारानुसार एमसीए सरकारला बांधकाम क्षेत्राचे १ रुपये प्रती वर्ग यार्ड आणि रिकाम्या क्षेत्राचे १० पैसे प्रती वर्ग यार्डनुसार अशा हिशेबाने भाडे द्यायचे होते. यानंतर एमसीएने क्रिकेट सेंटर बनविल्यानंतर नवीन भाड्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. आता येथे बीसीसीआयचे मुख्यालयही आहे. नोटीसमध्ये थकीत सर्व रक्कम तातडीने भरण्यास सांगितली आहे. एमसीएने बांधकाम केले आहे त्याचेही करारानुसार भाडे थकलेले आहे, असे त्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -