पूर्णा रावराणेने पटकावले विक्रमासह सुवर्णपदक!

खेलो इंडिया स्पर्धा

Mumbai
पूर्णा

महाराष्ट्राच्या पूर्णा रावराणेने गुवाहाटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. 21 वर्षांखालील मुलींच्या गोळाफेकीत पूर्णाने 14.57 मीटर्सवर गोळा फेकत नव्या विक्रमाची नोंद केली. गेल्या वर्षी तिला 14. 10 मीटर्स या कामगिरीसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र एक पाऊल पुढे टाकताना पूर्णाने सुवर्ण तर मिळवले, पण विक्रमासह सुवर्ण कामगिरी झळाळून टाकली.

नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत पूर्णाने रौप्य पदक मिळवले होते. देशातील अव्वल खेळाडू असलेली पूर्णा आता भुवनेश्वर येथे फेब्रुवारीत होणार्‍या खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

दहिसरच्या व्हीपीएम स्पोर्टस क्लबमधून खेळाचे धडे गिरवणारी पूर्णाचे लक्ष्य 16 मीटर्सपर्यंत गोळा फेकून देशात महिलांमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याचे आहे. यासाठी ती प्रशिक्षक हिरेन जोशी आणि संतोष आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव करत आहे. खेलो इंडियामधील मोठ्या कामगिरीनंतर पूर्णा म्हणाली, ’आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपावण्याची ही माझी सुरुवात आहे. मला भारताचे प्रतिनिधित्व करून देशासह माझ्या क्लबचे नवा रोशन करायचे आहे. माझे प्रशिक्षक तसेच आई वडील यांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे मी आज यशाचा एक एक टप्पा पार करत आहे’.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here