घरक्रीडाओंकार पाटीलला सुवर्ण

ओंकार पाटीलला सुवर्ण

Subscribe

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

ओंकार पाटील आणि सद्दाम शेख या महाराष्ट्राच्या मल्लांनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या कुस्तीमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. कुस्तीच्या पहिल्याच दिवशी ग्रीको-रोमन प्रकारात महाराष्ट्राने दोन सुवर्ण पदकांसह एक रौप्य आणि तीन कांस्यपदके पटकावली.

२१ वर्षांखालील मुलांच्या ६० किलो वजनी गटात सद्दाम शेखने पहिल्या फेरीतील ४० सेकंदातच ८-० अशी आघाडी मिळवून रवीवर तांत्रिक विजय मिळवला आणि सुवर्णपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो वजनी गटात हरियाणाचा मल्ल ललितविरुद्धच्या अंतिम सामन्यात ओंकार पाटीलने चार गुणांची पिछाडी भरून काढत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच वजनी गटात प्रतिक पाटीलने कर्नाटकच्या भारतचा ६-३ असा पराभव करत कांस्यपदक मिळवले.

- Advertisement -

तसेच प्रविण पाटील आणि कुंदन यादव यांनाही कांस्यपदक मिळवण्यात यश आले. १७ वर्षांखालील मुलांच्या ५१ किलो वजनी गटात विवेक सावंतने रौप्यपदक जिंकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -