तितिक्षा पाटोळेला रिलेत रौप्य

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

Mumbai
तितिक्षा पाटोळे

तितिक्षा पाटोळेचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने खेलो इंडिया स्पर्धेतील ४ बाय ४०० रिलेमध्ये रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या या संघात तितिक्षासोबत पूर्वा सावंत, शिवेच्छा पाटील आणि रिया पाटील या खेळाडूंचा समावेश होता. त्यांनी ४ बाय ४०० रिले शर्यत ३ मिनिटे आणि ५९.०८ सेकंदात पूर्ण केली.

तितिक्षाने याआधी २०१६-१७ मध्ये राज्यस्तरीय सब-ज्युनियर स्पर्धेत ६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत चांगली कामगिरी केली होती. ती कोल्हापूरच्या बाळराजे स्पोर्ट्समध्ये सराव करते. तितिक्षा आणि रिया या कोलापूरच्या असून पूर्वा मुंबई, तर शिवेच्छा पुण्याची आहे.

पूजाचा सुवर्ण चौकार!
महाराष्ट्राच्या पूजा दानोळेने खेलो इंडियात सायकलिंगच्या वैयक्तिक परस्यूट स्पर्धेत चौथे सुवर्णपदक मिळवले. पूजाने वैयिक्तक चौथे सुवर्णपदक जिंकताना बुधवारी २०० मीटर परस्यूट शर्यतीत २ मिनिटे आणि ४७.४१५ सेकंद अशी वेळ नोंदवली. तिचा वेग ताशी ४३.०१ प्रति किमी. इतका होता. पूजाने या स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक कांस्य अशी पाच पदके जिंकली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here