घरक्रीडामहिलांच्या टी-20 सामन्याने केली आयपीएलची पायाभरणी

महिलांच्या टी-20 सामन्याने केली आयपीएलची पायाभरणी

Subscribe

२०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. या कामगिरीनंतर भारतात महिला आयपीएल सुरु करण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची चाचपणी करण्यासाठी बीसीसीआयने प्ले-ऑफ सामन्यांच्या आधी मंगळवारी ता. (२२) महिला खेळाडूंचा एक प्रदर्शनीय टी-२० मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना आयोजित केला होता. आयपीएल सुपरनोवा, आयपीएल ट्रेलब्लेजर्स या दोन संघांमध्ये हा सामना रंगला होता.

हरमनप्रीत कौर आईपीएल सुपरनोवाचे तर स्मृति मंधाना हिने ट्रेलब्लेजर्स या संघाचेwomen’s cricket, नेतृत्व केले. सुपर नोव्हा संघाने नाणेफेक जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रेलब्लेजर्स या संघांनी प्रथम फलंदाजी करत दुसऱ्या संघापुढे ६ गडी बाद १३० धावांचे लक्ष्य ठेवले. ट्रेलब्लेजर्स संघाकडून सूजी बेट्स ३२, जेमिमा रोड्रिग्ज २५, दीप्ती शर्मा २१ यांनी धावा केल्या. सुपर नोव्हा संघाकडून मेगन स्कट, एलसी पेरी यांनी प्रत्येकी २ गडी राजेश्वरी गायकवाड आणि अनुजा पाटील यांनी १ गडी बाद केले. १३० धावसंख्येचा पाठलाग करताना सुपर नोव्हा संघांनी दमदार सुरवात केली. डेनियल वैट आणि मिताली राज यांनी सलामी जोडीने ५ षटकामध्ये ४७ धावसंख्या उभारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. एकता बिस्ट मितालीला बाद करत संघाचे आव्हान कायम ठेवले. हि धावसंख्या नोव्हा संघाने षटकामध्ये सहज पार केले. संघातर्फे सर्वाधिक संख्या केले. सामनावीर म्हणून यांना घोषित करण्यात आले. महिला खेळाडूंचा टी-२० संघांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. तसेच महिलाही तुफानी फलंदाजी करत उपस्थिताची मने जिंकली.

- Advertisement -

गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेने क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आयपीएलच्या सामन्यांना मिळणारी प्रसिद्धी पाहता, बीसीसीआय आगामी तीन वर्षांमध्ये महिला आयपीएल सुरु करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यासंदर्भातले संकेत दिले आहेत. आगामी २-३ वर्षांमध्ये आम्ही महिला आयपीएलचे आयोजन करण्याच्या विचारात आहोत, मात्र यासंदर्भात अधिक कोणतीही माहिती माहिती राय यांनी प्रसारमाध्यांना दिली नाहीये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -