घरक्रीडादक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेला महाराष्ट्राचे बळ

दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेला महाराष्ट्राचे बळ

Subscribe

'दक्षिण आशियाई श्री' स्पर्धेचा थरार एप्रिल-मे २०१९ दरम्यान नेपाळमध्ये पाहायला मिळणार आहे.

देशातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेची ताकद आता आणखी वाढली आहे. राज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर मार्च महिन्यात ‘भारत श्री’चे अभूतपूर्व आयोजन आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या ‘आशिया श्री’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य-दिव्य आयोजन करण्याची मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्यावर आता दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा पॉल चुआ यांनी प्रशांत आपटे यांच्या निवडीची नुकतीच घोषणा करून महाराष्ट्र शरीरसौष्ठवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

राज्य संघटनेच्या भरीव आणि धोरणात्मक कार्यामुळे महाराष्ट्र हे शरीरसौष्ठवातील देशातील सर्वात बलशाली राज्य आधीच बनले आहे. भारतातील सर्वाधिक शरीरसौष्ठवपटू हे महाराष्ट्रातूनच येतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य आणि देशाचे नाव ते उज्ज्वल करीत आहेत. शरीरसौष्ठवाकडे पाहिल्यावर प्रत्येक राज्याला वाटावे की राज्य असावे तर महाराष्ट्रासारखे, शरीरसौष्ठवपटू असावे तर महाराष्ट्रासारखे, आयोजन असावे तर महाराष्ट्रासारखे. हेच आपले आहे. माझ्या कार्यकाळात दक्षिण आशियातील शरीरसौष्ठवाला आलेली मरगळ दूर करून पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न मी करेल. पॉल चुआ यांनी दिलेल्या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवेन. – प्रशांत आपटे, नवनिर्वाचित अध्यक्ष

पुन्हा दिसणार ‘दक्षिण आशियाई श्री’चा थरार

गेले काही वर्षे थंडावलेल्या ‘दक्षिण आशियाई श्री’ स्पर्धेला पुन्हा एकदा चालना देण्याचे काम नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत आपटे करणार आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारताच येत्या एप्रिल-मे २०१९ दरम्यान नेपाळमध्ये दक्षिण आशियाई श्री स्पर्धा घेणार असल्याचे जाहीर केले. ते आतापासूनच या स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीला लागले असून या स्पर्धेच्या निमित्ताने दक्षिण आशियाई श्रीला गतवैभव मिळवून देण्याचे आपले प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

या स्पर्धेत दक्षिण आशियातील भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव हे देशही आपले दंड थोपटतील. नेपाळपाठोपाठ २०२० सालच्या दक्षिण आशियाई स्पर्धेचे यजमानपद मालदीवला देण्यात आल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. त्यामुळे दक्षिण आशियाई शरीरसौष्ठवाचा पीळदार संघर्ष पुन्हा एकदा शरीरसौष्ठवप्रेमींना नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वासही आपटे यांनी बोलून दाखविला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -