घरक्रीडाप्रीमियर लीग : लिव्हरपूलची आर्सनलवर मात

प्रीमियर लीग : लिव्हरपूलची आर्सनलवर मात

Subscribe

स्टार खेळाडू मोहम्मद सलाहच्या दोन गोलांच्या जोरावर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात आर्सनल संघावर ३-१ अशी मात केली. लिव्हरपूलचा प्रीमियर लीगमधील हा सलग बारावा आणि या मोसमातील सलग तिसरा विजय होता. प्रीमियर लीगच्या नव्या मोसमात आपले सर्व सामने जिंकणारा लिव्हरपूल हा एकमेव संघ आहे.

या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. या सामन्याच्या १३ व्या मिनिटाला आर्सनलच्या पिअर एमरीक-ओबामियांगला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका गोल पोस्टच्या जवळून गेला. यानंतर लिव्हरपूलच्या साडियो माने आणि आर्सनलच्या निकोलस पेपेला मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. या सामन्याच्या ४१ व्या मिनिटाला लिव्हरपूलला कॉर्नर किक मिळाली. ट्रेंट अलेक्झांडर-आर्नोल्डच्या पासवर जोएल माटीपने उत्कृष्ट हेडर मारून गोल केला आणि लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांची ही आघाडी मध्यंतराला कायम राहिली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर लिव्हरपूलने त्यांचा आक्रमक खेळ सुरू ठेवला. या सामन्याच्या ४८ व्या मिनिटाला आर्सनलच्या डेविड लुईझने पेनल्टी बॉक्समध्ये सलाहला मागे खेचल्याने लिव्हरपूलला पेनल्टी मिळाली. या पेनल्टीचे सलाहने गोलमध्ये रूपांतर करत लिव्हरपूलची आघाडी दुप्पट झाली. ५८ व्या मिनिटाला लुईझने पुन्हा एक चूक केली आणि सलाहने पुन्हा याचा फायदा घेत गोल केला. त्यामुळे लिव्हरपूलची आघाडी ३-० अशी झाली. यानंतर आर्सनलने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या ८५ व्या मिनिटाला लुकास टोरेराने आर्सनलचे गोलचे खाते उघडले. मात्र, यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे लिव्हरपूलने हा सामना ३-१ असा मोठ्या फरकाने जिंकला.

मँचेस्टर युनायटेड पराभूत

- Advertisement -

मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर लीगमधील त्यांच्या तिसर्‍या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. क्रिस्टल पॅलेस संघाने त्यांचा २-१ असा पराभव केला. पॅलेसकडून जॉर्डन आयु आणि पॅट्रिक वॅन आन्होल्ट यांनी गोल केले. दुसरीकडे चेल्सीला विजय मिळवण्यात यश आले. टॅमी अब्राहामचे दोन गोल आणि मेसन माऊंटच्या गोलमुळे चेल्सीने नॉर्विचचा रंगतदार सामन्यात ३-२ असा पराभव केला. हा त्यांचा या मोसमातील पहिला विजय होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -