भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करता आला नाही. या कसोटीच्या पहिल्या डावात शॉ खातेही न उघडता बाद झाला, तर दुसऱ्या डावात तो केवळ चार धावा करू शकला. दोन्ही डावांमध्ये चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या फटीतून गेल्याने तो त्रिफळाचित झाला. त्यामुळे शॉच्या तंत्राविषयी सध्या बरीच चर्चा होत असून त्याच्यावर टीकासुद्धा होत आहे. मात्र, शॉसारख्या युवा खेळाडूंना परदेशात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे राहुल द्रविडसारखा महान फलंदाज परदेश दौऱ्यात भारतीय संघासोबत गेला पाहिजे, असे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसारला वाटते.
तुम्ही जेव्हा परदेशात खेळता, तेव्हा तुम्हाला द्रविडसारख्या महान फलंदाजाच्या मार्गदर्शनाची गरज भासते. परदेशातील परिस्थितीशी जुळवून घेण्यात भारतीय खेळाडूंना बरेचदा अपयश येते. त्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संघाने द्रविडसारख्या व्यक्तीला प्रशि