घरक्रीडाप्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची आजपासून सुरुवात

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची आजपासून सुरुवात

Subscribe

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात जेतेपदाकरिता १२ संघ येणार आमने-सामने

हैद्राबाद येथे प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या सातव्या हंगामाला आजपासून दणक्यात सुरूवात होणार आहे. या प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात जेतेपदाकरिता १२ संघ आमने-सामने येणार आहे. या नव्या हंगामात प्रत्येक संघ डबल राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. मागील सहा हंगामामध्ये झालेल्या प्रो कबड्डी खेळाने प्रत्येक भारतीयांच्या मनात कबड्डी खेळाकरिता उत्सुकता निर्माण केली असून कबड्डीच्या सातव्या हंगामाची देखील या खेळाचे चाहते आतुरतेने वाट पाहत असून प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची पर्वणी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

२० जुलैपासून अर्थात आज तेलगू टायटन्स व यू मुम्बा या संघांमध्ये सातव्या नव्या हंगामातील पहिला सामना रंगणार आहे. हा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होईल. या हंगामातील सर्वाधिक १ कोटी ४५ लाखांची बोली लावलेल्या तेलगू टायटन्सच्या सिद्धार्थ देसाई याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या वर्षामध्ये यू मुम्बा संघाकडून खेळत त्याने २१८ गुणांची कमाई केली होती. त्यामुळे आपल्या जुन्या संघाच्या विरोधात खेळताना त्याची कामगिरी कशी असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागणार आहे. यासोबतच कर्णधार अबोझर व विशाल भारद्वाज यांच्यावर संघाच्या बचावफळीची जबाबदारी असेल. दुसरीकडे फाजल अत्राचलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या यू मुम्बा संघाकडे संदीप नरवाल व सुरेंदर सिंग यांकडून संघांना अपेक्षा असतील.

- Advertisement -

तर स्पर्धेतील दुसरा सामना बंगळुरू बुल्स व पटणा पायरेटस् यांच्यात होणार असून, गतविजेत्या बंगळुरू संघासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान असाणार आहे. संघाची जबाबदारी ही पवन शेरावत याच्याकडे असणार आहे. त्याने आपल्या मागे २७१ गुणांची कमाई करीत छाप पाडली होती यंदा त्याला महेंद्र सिंगची देखील साथ मिळणार आहे. पटना पायरेटस् संघाकडून परदीप नरवालने चढाईत छाप पाडली आहे. त्याला जँग कुन ली व मोहम्मद महाली यांची साथ मिळणार आहे.

७व्या हंगामात प्रो कबड्डी लीगमधील बदल

आयपीएलप्रमाणे प्रो कबड्डी सामन्यात चुरस वाढवण्यासाठी यंदा साखळी फेरीत सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ एकमेकांशी दोनवेळा खेळेल आणि अव्वल सहा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. प्रत्येक शहरात शनिवारी लीग लढतींना सुरुवात होईल. तसेच मंगळवारचा दिवस हा विश्रांतीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात २० जुलै रोजी स्पर्धेला सुरुवात होईल तर १९ ऑक्टोबर रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

७व्या हंगामातील सहभागी संघ

प्रो-कबड्डीच्या सातव्या सीझनमध्ये १२ संघ सहभागी होणार असून साखळी फेरीत प्रत्येक संघाला चार सामने खेळता येतील. स्पर्धेत सहभागी होणारे संघ पुढीलप्रमाणे…

बंगाल वॉरियर्स
बेंगळुरू बुल्स (२०१८ चा विजेता)
दबंग दिल्ली के. सी.
गुजरात फॉर्चुन जायंट्स
हरयाणा स्टीलर्स
जयपूर पिंक पॅंथर्स (२०१४ चा चॅम्पियन)
पाटणा पायरेट्स (तीनदा विजेता – जानेवारी २०१६, जून २०१६ व २०१७)
पुणेरी पलटण
तामीळ थलैवाज
तेलुगू टायटन्स
यू मुम्बा (२०१५ चा विजेता)
यूपी योद्धा

या ठिकाणी होणार प्रो कबड्डीचा थरार

‘प्ले-ऑफ’सह यंदाच्या स्पर्धेत एकूण ७२ सामने होणार आहेत. हैदराबाद, मुंबई, पाटणा, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता, पुणे, जयपूर, पंचकुला, ग्रेटर नॉएडा अशा १२ शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -