Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा 'या' भारतीय फलंदाजाने मारले तब्बल १७ षटकार, केल्या नाबाद १४६ धावा 

‘या’ भारतीय फलंदाजाने मारले तब्बल १७ षटकार, केल्या नाबाद १४६ धावा 

मेघालयने मिझोरमचा १३० धावांनी धुव्वा उडवला.

Related Story

- Advertisement -

भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली. या स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात मेघालयने मिझोरमचा १३० धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात मेघालयचा कर्णधार पुनीत बिश्तने ५१ चेंडूत नाबाद १४६ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि तब्बल १७ षटकारांचा समावेश होता. बिश्तने २६ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतरच्या २५ चेंडूत त्याने ९४ धावा फटकावल्या. चेन्नईच्या गुरु नानक कॉलेजच्या मैदानावर बिश्तने षटकारांची आतिषबाजी केली.

प्लेट ग्रुपच्या या सामन्यात मेघालयने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २३० अशी धावसंख्या उभारली. त्यांचा कर्णधार बिश्तने ५१ चेंडूतच नाबाद १४६ धावांची खेळी केली. त्याला सलामीवीर योगेश तिवारीने (४७ चेंडूत ५३) चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी रचल्याने मेघालयने दोनशे धावांचा टप्पा पार केला. २३१ धावांचा पाठलाग करताना मिझोरमला २० षटकांत ९ बाद १०० धावाच करता आल्या. त्यामुळे मेघालयने हा सामना १३० धावांनी जिंकला. या विजयामुळे मेघालयला ४ गुण मिळाले.

- Advertisement -