घरक्रीडा'मी निवृत्त होतेय'! पी. व्ही. सिंधूच्या घोषणेने चाहत्यांना धक्का 

‘मी निवृत्त होतेय’! पी. व्ही. सिंधूच्या घोषणेने चाहत्यांना धक्का 

Subscribe

सिंधूने 'मी निवृत्त होतेय,' असे ट्विट करत चाहत्यांना धक्का दिला.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू केवळ भारतातीलच नाही, तर जगातील सर्वोत्तम महिला बॅडमिंटनपटूंपैकी एक मानली जाते. सिंधू कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे. अशातच सोमवारी सिंधूने ‘मी निवृत्त होतेय,’ असे ट्विट करत चाहत्यांना धक्का दिला. तिने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक पत्र लिहिले. ‘डेन्मार्क ओपन ही माझी शेवटची स्पर्धा होती. मी निवृत्त होतेय,’ असे तिने या पत्रात लिहिले. मात्र, पत्राच्या शेवटी चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. ती खेळातून निवृत्त होणार नसून ‘आज मी सध्याच्या अनिश्चिततेच्या परिस्थितीतून निवृत्त होतेय. मी या नकारात्मकतेतून निवृत्त होतेय,’ असे ती पत्रात म्हणते.

- Advertisement -

कोरोना महामारीने माझे डोळे उघडले आहेत. मी कट्टर प्रतिस्पर्ध्याला झुंज देण्यासाठी खूप सराव करू शकते. मी हे याआधीही केले आहे आणि पुढेही करू शकते. मात्र, या न दिसणाऱ्या विषाणूवर, ज्याने जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे, त्यावर मात करण्यासाठी काय करू शकते? आपण बऱ्याच महिन्यांपासून घरात आहोत आणि आताही घराबाहेर पडताना स्वतःला काही प्रश्न विचारतो. मी इंटरनेटवर बऱ्याच लोकांच्या कोरोनाच्या काळातल्या कथा वाचल्या आणि त्यामुळे आपण कोणत्या जगात राहत आहोत? असा प्रश्न मला पडला. डेन्मार्क ओपनमध्ये खेळू न शकणे हा माझ्यासाठी शेवट होता. मी आज मी सध्याच्या अनिश्चिततेच्या परिस्थितीतून निवृत्त होतेय. मी या नकारात्मकतेतून निवृत्त होतेय, असे सिंधूने पत्रात लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -