घरक्रीडालाल मातीचा बादशाह 'नदाल'च; जोकोविचला हरवून जिंकले २० वे ग्रँड स्लॅम

लाल मातीचा बादशाह ‘नदाल’च; जोकोविचला हरवून जिंकले २० वे ग्रँड स्लॅम

Subscribe

फ्रेचं ओपन टेनिस स्पर्धेच्या (French Open 2020) अंतिम सामन्यात पुन्हा एकदा राफेल नदालने विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात नडालने नोवाक जोकोविचचा ६-०, ६-२ आणि ७-५ असा दणदणती पराभव केला. नदालचे लाल मातीवरील हे १३ वे फ्रेंट ओपन टायटल आहे. तर एकूण ग्रँड स्लॅम विजयाबाबत त्याने आता फेडररची बरोबरी केली आहे. फेडररच्या नावावर २० ग्रँड स्लॅम होते. आता नदालच्या नावावर देखील एकूण २० ग्रँड स्लॅम झाले आहेत.

फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात नदालने जोकाविचला तीनही सेटमध्ये लाल माती चारली. २०२० मध्ये २० वे ग्रँड स्लॅम जिंकून नदालने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे नोवाक हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरचा खेळाडू आहे तर नदाल दुसऱ्या स्थानावर आहे. नदालने फ्रेंच ओपनमध्ये आतापर्यंत १०० वेळा विजय मिळवला आहे. तर फ्रेंच ओपनमध्ये त्याचा रेकॉर्ड १००-२ असा आहे. पॅरिसमध्ये लागोपाठ चौथ्यांदा तो ग्रँड स्लॅम जिंकला आहे.

- Advertisement -

नदाल आणि जोकोविचमध्ये १५ वर्षांचे अंतर आहे. १९७२ नंतर पहिल्यांदाच अधिक वयाच्या खेळाडूने फ्रेंच ओपन खिताब जिंकण्याचा विक्रम केला आहे.

स्पेनच्या या दिग्गज खेळाडूने आतापर्यंत २००५-०८ च्या मध्ये लागोपाठ चार वेळा तर २०१०-१४ दरम्यान लागोपाठ पाच वेळा फ्रेंच ओपनचा खिताब जिंकला होता. यासोबतच चार वेळा अमेरिका ओपन आणि दोन वेळा विम्बलडन आणि एक वेळेस ऑस्ट्रेलिया ओपन हा खिताब जिंकलेला आहे. नदाल आणि रॉजर फेडरर यांनी एकत्रच टेनिस कारकिर्दीची सुरुवात केली होती. २००३ साली फेडररने आपला पहिला विम्बलडन खिताब जिंकला होता. तर नदालने २००५ साली आपला पहिला खिताब जिंकला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -