घरक्रीडानदालचा 'विनम्र' विमान प्रवास

नदालचा ‘विनम्र’ विमान प्रवास

Subscribe

टेनिस जगतातील अनभिषिक्त सम्राट राफेल नदालने चक्क विमानाच्या इकोनॉमी क्लासमधून प्रवास करत त्याच्या चाहत्यांसह सर्वानांच आश्चर्यचकित केले आहे.

सध्या प्रत्येक खेळातील खेळाडू हे आपल्या खेळासोबतच त्यांच्या लाइफस्टाईलसाठी देखील जास्त चर्चेत असतात. अगदी राज्यस्तरीय खेळाडू देखील आपल्या स्टाईल आणि राहणीमानाचा गाजावाजा करताना आपल्याला दिसतात. मात्र याचवेळी फॉर्ब्सच्या यादीत टॉप १०० मध्ये असणाऱ्या राफेल नदालसारख्या महान टेनिस खेळाडूने चक्क विमानाच्या इकोनॉमी क्लासमधून प्रवास करत जगाला आपल्या विनम्रपणाची ओळख करून दिली आहे.

राफेल बार्सिलोनाकडून आपले मूळ घर मॅलोर्काकडे प्रवास करत होता. विमानाने जात असताना विमानाच्या इकोनॉमी क्लासमधून प्रवास करतानाचा राफेलचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदाल या फोटोत अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे वृत्तपत्र वाचताना दिसत आहे.

- Advertisement -

नदाल नुकत्याच झालेल्या विम्बल्डन २०१८ स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पराभूत झाला असून त्याने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन केले होते. मात्र सेमी फायनलमध्ये राफेल नोव्हाककडून पाच सेट्समध्ये ६-४, ३-६, ७-६, ३-६,१०-८ च्या फरकाने पराभूत झाला. नदाल आणि नोव्हाक दोघेही यापूर्वी जेव्हा-जेव्हा आमने-सामने आले आहेत, तेव्हा सामना अटीतटीचा झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी नदालविरूद्ध नोव्हाक यांच्यात झालेल्या सामन्यात नोव्हाकने २७-२५ च्या फरकाने सामना जिंकला.

नदालने इकोनॉमी क्लासमधून प्रवास केल्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी बऱ्याच पोस्ट केल्या असून या सर्व पोस्टमध्ये त्याने दाखवलेल्या विनम्रपणाचे पोवाडे गायले गेले आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंत सेलेब्रिटींमध्ये नदाल ७२ व्या स्थानावर असून ४१.४ कोटी अमेरिकन डॉलर एवढे त्याचे एकूण उत्पन्न आहे. इतकी कमाई असूनही त्याने इकोनॉमी क्लासमधून प्रवास केल्याने जगाला आपल्या साधेपणाची ओळख करून दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -