Asian Games 2018: राहीला एअर पिस्तूलमध्ये गोल्ड

भारताची नेमबाज राही सरनोबत हिने २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात गोल्ड मेडल जिंकून भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला आहे. एशियन गेम्समध्ये राहीने मिळवलेल्या या मेडलमुळे पदकांच्या मालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

Jakarta
rahi-sarnobat
राही सरनोबत

जकार्ता येथे सुरु असलेल्या Asian Games 2018 मध्ये भारताची राही सरनोबतने २५ मीटर एअर पिस्तूल शुटिंग स्पर्धेत गोल्ड मॅडल जिंकले आहे. Asian Games च्या चौथ्या दिवशी मिळालेल्या या यशामुळे भारत पदक तालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सामन्यात राहीने थायलंडची नापशावान हिला शूटऑफमध्ये ३-२ ने हरवले. दोन्ही खेळाडूंचा स्कोअर ३४-३४ ने बरोबर होता. मात्र अंतिम निर्णय राहीच्या बाजूने घोषित करण्यात आला होत. Asian Games 2018 मध्ये नेमबाजीत गोल्ड मिळवणारी राही पहिली महिला नेमबाज बनली आहे. मिळालेल्या यशामुळे आता भारताच्या पदरात एकूण ११ पदके पडली आहेत. भारताकडे आता चार सुवर्ण, तीन रजत आणि चार कांस्य पदक आहेत.


Asian Games मध्ये राहीचे हे पहिलेच पदक आहे. दक्षिण कोरियाची किम मिनजुंग ने कांस्य पदक मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. भारताची मनु भाकर ने १६ गुणांची कमाई करत सहावा क्रमांक पटकावला आहे. राही सरनोबतचा जन्म ३० ऑक्टोबर १९९० रोजी कोल्हापूर येथे झाला. ५ एप्रिल २०१३ रोजी झालेल्या आईएसएसएफ वर्ल्डकप २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत कोरियाच्या चांगवांग ला ८-६ ने हरवून सुवर्ण पदक मिळवले होते. या अगोदर २०११ मध्ये अमेरिकेत झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतही तिने कांस्य पदक जिंकले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here