घरक्रीडाकर्णधार म्हणून राहुल द्रविडला म्हणावे तितके श्रेय मिळत नाही!

कर्णधार म्हणून राहुल द्रविडला म्हणावे तितके श्रेय मिळत नाही!

Subscribe

गौतम गंभीरचे मत

राहुल द्रविड हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये ३६ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ अशी एकूण ४८ आंतरराष्ट्रीय शतके त्याच्या नावे आहेत. परंतु, तो जितका उत्कृष्ट फलंदाज होता, तितकाच उत्कृष्ट कर्णधार होता, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला वाटते. द्रविडच्या नेतृत्वात भारताने २००६ सालात वेस्ट इंडिजमध्ये, तर २००७ साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. मात्र, त्यानंतरही द्रविडला कर्णधार म्हणून म्हणावे तितके श्रेय मिळत नसल्याची खंत गंभीरला आहे.

मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण सौरव गांगुलीच्या नेतृत्वात, तर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण राहुल द्रविडच्या नेतृत्वात केले. कर्णधार म्हणून द्रविडला म्हणावे तितके श्रेय मिळत नाही. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांविषयी चर्चा करताना आपण सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहलीचे नाव घेतो.

- Advertisement -

परंतु, भारताचे नेतृत्व करताना द्रविडनेही खूप यश मिळवले आहे. त्याचे आकडे अप्रतिम असून अनेक विक्रमही त्याच्या नावे आहेत. मात्र, त्यानंतरही त्याला खेळाडू म्हणून आणि कर्णधार म्हणून पुरेसे श्रेय दिले जात नाही. भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडइतका बहुधा दुसर्‍या कोणत्याही खेळाडूने प्रभाव पाडलेला नाही, असे गंभीर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -