घरक्रीडाऋषभ पंत कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सक्षम - राहुल द्रविड

ऋषभ पंत कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सक्षम – राहुल द्रविड

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात आएपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतला संधी देण्यात आल्याचा निर्णय अप्रतिम असल्याचे भारताचा माजी खेळाडू आणि भारतीय 'अ' संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने सांगितले आहे.

भारताचा कसोटीतील मुख्य यष्टीरक्षक वृद्धिमान साहा दुखापतीमुळे इंग्लंड दौर्‍यातून बाहेर गेला आणि त्याच्याजागी यावर्षी आयपीएलमध्ये आणि भारत ‘अ’ संघाच्या इंग्लंड दौर्‍यात अप्रतिम प्रदर्शन करणार्‍या ऋषभ पंतची संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड त्यामुळे बराच खुश झाला असून त्याच्या मते पंत कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.

काय म्हणाला राहुल…?

एका मुलाखतीत याबद्दल राहुलने सांगितलेकी, “ऋषभ पंतसाठी भारतीय अ संघाचा इंग्लंड दौरा खूप फायदेशीर ठरला आहे. आपण परिस्थितीनुसार खेळू शकतो हे या दौर्‍यात त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. ऋषभचा नैसर्गिक खेळ हा खूप आक्रमक आहे. त्यामुळे तो त्याची शैली बदलणार नाही. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याला थोडा संयम बाळगावा लागेल. तसे जर त्याने केले तर तो कसोटी क्रिकेटमध्येही यशस्वी होईल यात शंका नाही. पंतने भारतीय ‘अ’ संघाच्या या इंग्लंड दौर्‍यात ८ सामन्यांत २९९ धावा केल्या. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश होता. याबद्दल द्रविड म्हणाला, ” आम्ही ऋषभला या दौर्‍यात वेगवेगळ्या परिस्थिती फलंदाजीला पाठवले. त्याने या दौर्‍याच्या एकदिवसीय त्रिशंकू मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड लायन्ससविरुद्ध मोक्याचा क्षणी नाबाद ६४ धावांची खेळी करत आम्हाला सामना जिंकवून दिला होता. तसेच वेस्ट इंडिज ‘अ’ विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने जयंत यादव सोबत १०० धावांची भागीदारी करत आम्हाला सामना जिंकवून दिला होता. त्यामुळे त्याने आपण कोणत्याही परिस्थितीत खेळू शकतो हे दाखवून दिले आहे. जर त्याला इंग्लंडविरुद्ध खेळायची संधी मिळाली तर त्यात तो चांगले प्रदर्शन करेल याचा मला विश्वास आहे.”

- Advertisement -

१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारतविरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. ज्यात वृद्धिमान साहाच्या जागी ऋषभ पंत हा महत्वाचा बदल असून त्याचसोबत भुवनेश्वर कुमार त्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असणार आहे. त्याचसोबत हिटमॅन रोहित शर्माही संघाबाहेर असेल. ऋषभला देण्यात आलेल्या या संधीचे तो सोने करतो का? हे पाहाणे औस्तुक्याचे राहिल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -