घरक्रीडातुषार म्हात्रे कर्णधारपदी

तुषार म्हात्रे कर्णधारपदी

Subscribe

राज्यस्तरीय क्रिकेटसाठी रायगड संघाची घोषणा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडच्या संघाची घोषणा करण्यात आली. तुषार म्हात्रेची या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. रायगडला या स्पर्धेत दोन दिवसीय पाच सामने खेळायचे आहेत.

त्यातील पहिला सामना २८ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी सांगितले.

- Advertisement -

रायगडचा संघ – तुषार म्हात्रे (कर्णधार), सागर सावंत, भरत सोलंकी, सिद्धांत म्हात्रे, रितेश तिवारी, अभिषेक खातू, ॠषिकेश राऊत, विक्रांत जैन (यष्टीरक्षक), रिझवान खान, ओमकार गावडे, प्रतीक म्हात्रे, देवांश तांडेल, यश माने, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ साळवी, जयेश म्हात्रे, अजिंक्य रसाळ, चैतन्य भोईर, अमोल पवार, देवांश जाधव (यष्टीरक्षक), यश पाटील, हार्दिक करंगळे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -