घरक्रीडाभारतीय महिला क्रिकेट संघाचे तात्पुरते प्रशिक्षक रमेश पोवार

भारतीय महिला क्रिकेट संघाचे तात्पुरते प्रशिक्षक रमेश पोवार

Subscribe

रमेश पोवार हे भारताचे माजी खेळाडू असून त्यांनी दोन कसोटीं सामन्यात सहा बळी तर ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४ बळी टिपले आहेत.

महिला टी-२० विश्वचषक अवघ्या ५ महिन्यांवर येऊन ठेपला असताना भारतीय महिला क्रिकेट संघांचे माजी प्रशिक्षक तुषार आरोटे यांनी काही दिवंसापूर्वी राजीनामा दिला. अशावेळी संघाला प्रशिक्षण देण्यासाठी भारताचे माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार आरोटे यांना योग्य पर्याय उपलब्ध होईपर्यंत रमेश यांची प्रशिक्षक म्हणून नेमणुक केली गेली आहे.

यावेळी रमेश यांनी सांगितलेकी, “मला ही जबाबदारी देण्यात आल्यामुळे मी खूप आनंद आहे आणि मी महिला संघाची कामगिरी उंचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन.” रमेश पोवार हे भारताचे माजी खेळाडू असून त्यांनी भारताकडून खेळताना दोन कसोटीं सामन्यात सहा तर ३१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत. आपल्या ऑफ फिरकी गोलंदाजीसाठी ते खास फेमस होते.

- Advertisement -

रमेश पोवार ऑस्ट्रेलियातील युवा फिरकीपटूंना प्रशिक्षण देत होता
रमेश पोवार एमसीए क्रिकेट अकादमीच्या फिरकी बॉलिंग प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीच्या अखेरीस रवाना झाले होते आणि युवा फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षण देण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन प्रशिक्षक 55 पेक्षा कमी वर्षांचा असावा आणि आंतरराष्ट्रीय किंवा प्रथम श्रेणीतील प्रशिक्षकाचा अनुभव असावा. रमेश पोवार यांनी ऑस्ट्रेलियातील युवा फिरकीपटूंना देखील प्रशिक्षण दिले आहे. रमेश यांनी एमसीए क्रिकेट अकादमीच्या फिरकी बॉलिंग प्रशिक्षकपदाची धुरा त्यांनी सांभाळली असून आता ते भारतीय महिला क्रिकेट संघांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

का दिला तुषार आरोटेंनी राजीनामा ?

- Advertisement -

भारतीय महिला संघातील खेळाडू आणि तुषार यांच्यात चाललेल्या वादामुळे त्यांना राजीनामा दिला होता. त्यांचा असा आरोप होताकी, भारतीय महिला संघातील खेळाडू आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येत नाहीत, तसेच आपल्या सरावावरही त्या लक्ष देत नाहीत. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील या वादामुळे तुषार आरोटे यांनी राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “आपण खेळाडूंना हवी ती सरावपद्धत वापरू शकत नाही, तसेच जर त्यांना काही साध्य करायचे आहे तर त्यांना आपल्या आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला हवे”

सौजन्य- हिंदुस्थान टाईम्स
सौजन्य- हिंदुस्थान टाईम्स

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -