घरक्रीडामहान रणजीपटू राजिंदर गोयल यांचे निधन

महान रणजीपटू राजिंदर गोयल यांचे निधन

Subscribe

महान रणजीपटू राजिंदर गोयल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा नितीन गोयल असा परिवार आहे. नितीनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला असून आता स्थानिक क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून काम करत आहे. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. ते भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट डावखुर्‍या फिरकीपटूंपैकी एक होते. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी क्रिकेटला खूप योगदान दिले, असे म्हणत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रणबीर सिंग महेंद्रा यांनी गोयल यांना आदरांजली वाहिली.

डावखुरे फिरकीपटू राजिंदर गोयल यांची भारतीय स्थानिक क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या संघांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी १५७ प्रथम श्रेणी सामन्यांत ७५० गडी बाद केले. तसेच रणजी करंडकात सर्वाधिक बळींचा (६३७) विक्रम त्यांच्याच नावे आहे. मात्र, त्यांच्या काळात बिशन सिंग बेदीसारखा उत्कृष्ट डावखुरा फिरकीपटू असल्याने गोयल यांना कधीही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

- Advertisement -

वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी सामनाधिकारी म्हणून काम केले. तसेच १९९१ मध्ये गोयल निवड समितीचे अध्यक्ष असताना कपिल देवच्या हरियाणाने बलाढ्य बॉम्बेला (आता मुंबई) पराभवाचा धक्का देत रणजी करंडकावर आपले नाव कोरले होते. क्रिकेटमधील योगदानासाठी गोयल यांना २०१७ मध्ये सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -