घरक्रीडारवी शास्त्रींचे पोट गोल गोल, सोशल मीडियावर झाले ट्रोल ट्रोल

रवी शास्त्रींचे पोट गोल गोल, सोशल मीडियावर झाले ट्रोल ट्रोल

Subscribe

बीसीसीआयने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून टाकलेल्या एका फोटोत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचे पोट सुटलेले दिसत असल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे.

कोणताही खेळाडू म्हटलं की, सर्वात महत्त्वाची गोष्ट असते त्याचा फिटनेस. खेळाडूंना जसा स्वतःचा फिटनेस सांभाळावा लागतो, तसा त्यांना मार्गदर्श करणाऱ्या प्रशिक्षकालादेखील किमान फिटनेसकडे लक्ष द्यावेच लागते. गुरू ज्या गोष्टी सांगतो, त्याकडे गुरूने स्वतः लक्ष देणे महत्त्वाचे नाही का? याच प्रश्नावरून भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना सध्या सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागत आहे. भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून बीसीसीआयने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर भारतीय संघाच्या सरावाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही एक फोटो आहे. त्या फोटोत त्यांचे सुटलेले पोट दिसून येत असल्याने नेटिझन्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टेस्ट मॅचच्या सिरीजमधील पहिली टेस्ट गमावल्यानंतर दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघ सज्ज झाला असून सामना आजपासून लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. लॉर्ड्स हे इंग्लंडचे होम ग्राउंड असल्याने हा सामना जिंकण्यासाठी भारताला कसरत करावी लागणार आहे. मात्र या कसरती दरम्यान भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल व्हावे लागले आहे. रवी शास्त्रींचा मैदानावर उभा असलेला एक फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. ज्यात त्यांचे सुटलेले पोट दिसत आहे त्यामुळे नेटिझन्सनी शास्त्रींनाच फिटनेस टेस्टची गरज असल्याचे मिश्किल टोला मारत ट्रोल केले आहे. त्यासोबत काही लोकांनी शास्त्रींना डायट करायची खास गरज असल्याचा सल्ला दिला.

- Advertisement -


पहिल्या टेस्टमध्ये कर्णधार विराट सोडला तर दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला काही खास कामगिरी करता आलेली नाही. विराटने पहिल्या डावात केलेल्या १४९ आणि दुसऱ्या डावातील ५१ अशा एकूण २०० धावांचा डोंगर एकट्याने रचला मात्र त्याला चांगली साथ न मिळाल्याने भारत अवघ्या ३१ धावांनी पराभूत झाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारत कशी कामगिरी करेल हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -