विराट कोहली ‘मशीन’ नाही !

मानेच्या त्रासामुळे त्रस्त असल्याने विराट कोहली कौंटी क्रिकेटमधून माघार घेणार आहे. विराटचे चाहते आणि तमाम क्रिकेटप्रेमी या बातमीमुळे काहीसे नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर याविषयीच्या अनेक प्रतिक्रीयाही उमटत आहेत. मात्र, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री विराटच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.

शास्त्रींचा स्पष्ट खुलासा

या मुद्द्याबाबत बोलत असताना ‘विराट एक माणूस आहे, मशीन नव्हे’ असे रवी शास्त्री यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा वसूल करणाऱ्या विराटला टीम इंडियाची ‘रन मशीन’ म्हणून ओळखले जाते. मानेच्या त्रासामुळे त्याला कौंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली. अशा कठीण काळात भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ‘मानेत चमक भरल्याने विराटने कौंटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. विराट मशीन नाही. त्यात रॉकेट इंधन भरले आणि पार्कात घेऊन गेलो, असे होऊ शकत नाही. तोही एक माणूस आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी वर्तमानपत्राशी बोलताना दिली.

विराट सरी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही, हे ऐकून वाईट वाटले. विराट जखमी झाल्याने बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला कौंटी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला. त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया सरी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष एलेक स्टिव्हर्ट यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here