घरक्रीडाज्यांनी काहीतरी मिळवलंय त्यांचा सन्मान करायला शिका- जडेजा

ज्यांनी काहीतरी मिळवलंय त्यांचा सन्मान करायला शिका- जडेजा

Subscribe

भारतीय संघाचा क्रिकेटपटू रविद्र जडेजाने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांना खडेबोल सुनावले आहे. मांजरेकर यांनी महेंद्र सिंह धोनीच्या खेळी संदर्भात ट्विट केले होते.

भारत-बांग्लादेश सामना झाल्यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी भारतीय संघाच्या कामगिरीबाबत ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीवर टीका केली होती. याच टीकेवरुन रविंद्र जडेजाने महेश मांजरेकरांना खडेबोल सुनावले. ‘ज्या लोकांनी काहीतरी मिळवलय त्यांचा सन्मान करायला शिका’, अशा शब्दांमध्ये जडेजाने मांजरेकरांना उत्तर दिले. यावेळी धोनीच्या इतर चाहत्यांनी देखील संजय मांजरेकरांना ट्रोल केले.

काय म्हणाला जडेजा?

संजय मांजरेकरांना प्रत्युत्तर देताना रविंद्र जडेजा ट्विटमध्ये म्हणाला की, ‘आपल्या पेक्षा दुप्पट क्रिकेट सामने मी खेळले आहेत आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी काहीतरी मिळवलं आहे, त्यांचा सन्मान करायला शिकायला. मी आतापर्यंत तुमची बरीच बडबड एकूण घेतली.’ रविंद्र जडेजाच्या या ट्विटनंतर संजय मांजरेकरांनी काही उत्तर दिले नाही. मात्र नेटीझन्सनी मांजरेकरांना चांगलेच ट्रोल केले.

- Advertisement -

काय म्हणाले होते संजय मांजरेकर?

विश्वचषक स्पर्धेत भारत-बांग्लादेश सामन्यात भारताने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर संजय मांजरेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाबाबत ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लोकेश राहुल सलामीसाठी अजूनही फिट नसल्याचे म्हटले होते. याशिवाय त्यांनी मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चिंता व्यक्त केली होती. याचबरोबर त्यांनी धोनीच्या खेळीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर जडेजाने प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -