घरक्रीडारायडू, केदारमुळे भारतीय संघ झाला अधिक मजबूत - रोहित शर्मा

रायडू, केदारमुळे भारतीय संघ झाला अधिक मजबूत – रोहित शर्मा

Subscribe

आशिया चषकासाठी भारतीय संघात अंबाती रायडू आणि केदार जाधव यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे असे भारताचा कर्णधार रोहित शर्माचे मत आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले. या स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर अंबाती रायडू आणि केदार जाधव यांचेही संघात पुनरागमन झाले. त्यांचे संघातील पुनरागमन हे भारतासाठी चांगले आहे असे रोहित शर्माचे म्हणणे आहे.

रायडू, जाधव महत्वाची भूमिका बजावतील

भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “अंबाती रायडू आणि केदार जाधव यांच्या संघात पुन्हा येण्याने संघाचे मनोबल वाढले आहे. हे दोघेही खूप चांगले खेळाडू आहेत. हे दोघे या स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावू शकतात. या दोघांमुळे संघ अधिक मजबूत झाला आहे. रायडू आणि केदारकडून संघाला खूप अपेक्षा आहेत.”

मधल्याफळीचा प्रश्न सोडवण्याची गरज 

भारतीय संघात चौथ्या आणि सहाव्या स्थानावर कोण खेळणार यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे वर्ल्डकप २०१९ च्या दृष्टीने आशिया चषक भारतासाठी महत्वाची स्पर्धा ठरणार आहे. त्याविषयी रोहित म्हणाला, “संघात चौथ्या आणि सहाव्या स्थानासाठी बरेच खेळाडू आहेत. पण त्यांनी आपल्या खेळात सातत्य दाखवणे आवश्यक आहे. या दोन जागांसाठी अंबाती रायडू, केदार जाधव आणि मनीष पांडे यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपली संघात जागा पक्की करण्यासाठी या स्पर्धेचा त्यांना फायदा होऊ शकेल.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -