घरक्रीडाविराट कोहली..जिंकलंस भावा! घरात घुसून केकेआरला हरवलं!

विराट कोहली..जिंकलंस भावा! घरात घुसून केकेआरला हरवलं!

Subscribe

विराट कोहलीच्या आरसीबीला अखेर सूर गवसला असून कोलकात्यामध्ये झालेल्या आयपीएल मॅचमध्ये विराट सेनेनं कोलकाता नाईट रायडर्सला धूर चारत २ गुणांची कमाई केली आहे.

शुक्रवारी गुड फ्रायडे होता. पण विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी हा भलताच गुड फ्रायडे ठरला. २१३ रन करूनसुद्धा शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच खेचून नेणाऱ्या केकेआरला अत्यंत रंगतदार सामन्यात आरसीबीनं हरवलं. आयपीएलचा सीजन सुरू झाल्यापासून अडखळत खेळणारी आरसीबीची टीमची बॅटिंग शुक्रवारी मात्र परफेक्ट प्लॅनिंगनं खेळत होती. आणि या सगळ्यात चेरी ऑन द केक ठरली ती विराट कोहलीची संस्मरणीय शतकी खेळी. याच खेळीच्या जोरावर टीम विराटनं कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर चीतपट केलं आणि सीजनचा दुसरा विजय साजरा केला!

आरसीबीची सुरुवात संथ आणि खराब!

टॉस जिंकल्यानंतर केकेआरचा कॅप्टन दिनेश कार्तिकनं बॉलिंगचा निर्णय घेतला, तेव्हा वाटलं विराटची बॅटिंग ऑर्डर ढेपाळणार की काय! सुनील नारायण, प्रसिद कृष्णमा, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, पियुष चावला या केकेआरच्या बॉलिंग पंचसूत्रीनं आत्तापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना अनेकदा अडचणीत आणल्याचं दिसलंय. आज मात्र दिवस होता तो विराट कोहलीचा. विराटसोबत ओपनिंगला आलेला पार्थिव पटेल ११ रनांवर नरेनच्या बॉलिंगवर माघारी परतला, तेव्हा आरसीबीच्या चाहच्यांनी देवच पाण्यात ठेवले असतील. त्यानंतर आलेला अक्षदीप नाथ देखील फक्त १३ रन करून तंबूत परतला. तेव्हा आरसीबीचा स्कोअर होता ९ ओव्हरमध्ये ५९ रन.

- Advertisement -

विराटचा जलवा!

तिथून सुरू झाला विराट कोहलीचा जलवा! मोईन अलीला साथीला घेऊन विराट कोहलीनं केकेआरच्या बॉलिंगचं अक्षरश: कंबरडं मोडलं. एकीकडून विराट कोहली आणि दुसरीकडून मोईन अली केकेआरच्या तिखट मारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिंगची पिसं काढत होते आणि मैदानावरचे आरसीबीचे चाहते दिवाळीच साजरी करत होते. त्यातही विराट तर आज जबरदस्त टचमध्ये दिसत होता. त्याला हवी तशी केकेआरच्या बॉलर्सची तो धुलाई करत होता. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी फक्त ७ ओव्हरमध्ये तब्बल ९० रनांची पार्टनरशीप केली. कुलदीप यादवनं मोईन अलीला ६६ रनांवर आऊट केलं आणि केकेआरनं सुटकेचा नि:श्वास टाकला. पण अजूनही कोहली मैदानावर उभा होता..आणि महत्त्वाचं म्हणजे धुलाई सुरूच होती! त्यानंतर आलेल्या स्टोईसच्या साथीनं उरलेल्या ४ ओव्हरमध्ये कोहलीनं तब्बल ६४ रनांची भर घातली आणि आव्हान २१४ इतकं डोंगराएवढं करून ठेवलं. यामध्ये १०० रन एकट्या कोहलीचे होते. तेही फक्त ५८ बॉलमध्ये! आणि मोईन अलीच्या २८ बॉलमध्ये ६६ धावा!

Virat Kohli RCB vs KKR1
विराट कोहलीनं शुभम गिलचा पकडलेला अप्रतिम कॅच!

केकेआरची ‘ट्रिपल थ्री’ हालत!

एवढं मोठं आव्हान समोर असताना केकेआरची सुरुवात भयंकर निराशाजनक झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये ख्रिस लिन डेल स्टेनच्या बॉलिंगवर खुद्द कॅप्टन कोहलीकडे कॅच देऊन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभम गिलच्या साथीनं सुनील नारायणनं डाव सावरायचा प्रयत्न केला. पण तो स्वत:च नवदीप सैनीची शिकार ठरला आणि १८ रनांवर आऊट झाला. विराट कोहलीनं डेल स्टेनच्या बॉलिंगवर शुभम गिलचा(९) अप्रतिम कॅच पकडला, तेव्हा केकेआरचा स्कोअर होता ५ ओव्हर ३३ रन आणि ३ विकेट! ट्रिपल थ्री हालत! शेवटी राणानं रॉबिन उथप्पाच्या साथीनं केकेआरच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. पण ते प्रयत्न फारच अपुरे होते. केकेआरला शंभरी पार करायला तब्बल १४ ओव्हर लागल्या. उरलेल्या ६ ओव्हरमध्ये केकेआरला जिंकण्यासाठी अजून ११३ रनांची आवश्यकता होती. म्हणजे जवळपास १९ रन प्रत्येक ओव्हरला. आंद्रे रसल अजूनही क्रीजवर उभा असल्यामुळे कोलकाताच्या आशा जिवंत होत्या.

- Advertisement -

पंधराव्या ओव्हरमध्ये आंद्रे रसलनं यजुवेंद्र चहलला लागोपाठ तीन सिक्स खेचून आरसीबीच्या चाहत्यांच्या काळजात धडकी भरवली! पुढच्याच ओव्हरमध्ये नितीश राणानं सैनीला लागोपाठ २ सिक्स खेचून आपलं अर्धशतक साजरं केलं. तेही फक्त ३२ बॉलमध्ये! आरसीबीच्या चिंता हळूहळू वाढू लागल्या होत्या. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ४२ रनांचं टार्गेट असताना स्टॉयनिसच्या हातात कोहलीनं बॉल दिला. समोर आंद्रे रसल आणि राणा तुफान हाणामारी करत असताना स्टॉयनिसनं दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला ओव्हरचे पहिले ३ बॉल डॉट गेल्यानंतर पुढच्या ३ बॉलवर रसेलनं लागोपाठ ३ सिक्स ठोकून हिशोब बरोबर करून टाकला.

हे दोघं केकेआरला जिंकून देतायत की काय असं वाटत असतानाच कोहलीनं बॉल यजुवेंद्र चहलला न देता मोईन अलीकडे दिला आणि अलीनं टिच्चून बॉलिंग करत केकेआरच्या सर्व आशांवर पाणी फेरलं. एक बॉल शिल्लक राहिला असताना आंद्रे रसल रनआऊट झाला आणि आरसीबीनं सामना खिशात घातला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -