घरIPL 2020IPL 2020 : विराट कोहली पुन्हा RCBचा कर्णधार नकोच - गौतम गंभीर

IPL 2020 : विराट कोहली पुन्हा RCBचा कर्णधार नकोच – गौतम गंभीर

Subscribe

गंभीर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. बंगळुरूच्या संघाला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आली नसून यंदाही त्यांना जेतेपदाने हुलकावणीच दिली. त्यामुळे आता विराट कोहलीला बंगळुरूच्या कर्णधारपदावरून हटवण्याची वेळ आली आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. कोलकाता नाईट रायडर्सला दोनदा आयपीएल स्पर्धा जिंकवून देणारा गंभीर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. बंगळुरूच्या अपयशाला कोहलीचे नेतृत्वही कारणीभूत असल्याचे गंभीरला वाटते.

कोहलीला बंगळुरूच्या कर्णधारपदावरून हटवले पाहिजे, असे मला नक्कीच वाटते. बंगळुरूने प्रत्येकच खेळाडूला जबाबदार धरणे गरजेचे आहे. कोहली आठ वर्षे बंगळुरूचे नेतृत्व करत आहे आणि या संघाला एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आली नाही. आठ वर्षे हा खूप मोठा काळ आहे. मला दुसरा असा कर्णधार दाखवा, कर्णधार जाऊ देत अगदी खेळाडू दाखवा, जो आठ वर्षे जेतेपद न पटकावता त्या संघाचा भाग आहे. बंगळुरूच्या अपयशामागे कोहलीचे नेतृत्वही एक कारण असल्याचे गंभीर म्हणाला.

- Advertisement -

आठ वर्षे खूपच मोठा काळ आहे. आपल्यासमोर रविचंद्रन अश्विनचे उदाहरण आहे. अश्विनला केवळ दोन वर्षे किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पंजाबचा संघ आयपीएल स्पर्धा जिंकू न शकल्याने त्याला कर्णधारपदावरून हटवले गेले आणि संघाच्याही बाहेर काढले गेले, असेही गंभीरने सांगितले. तसेच गंभीरने बंगळुरूच्या संघावरही टीका केली. बंगळुरूचा संघ विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर जरा जास्तच अवलंबून असल्याचे गंभीरला वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -