टेनिसचा बादशाह रॉजर फेडररला अमेरिकन ओपनच्या उप-उपांत्यपूर्व पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचा जॉन मिलमन याने ३-६, ७-५, ७-५, ७-६ असा पराभव केला. त्यामुळे फेडररचे सहाव्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
कसा झाला सामना
फेडरर आणि मिलमन यांच्यातील सामन्याचा पहिला सेट फेडररने अगदी सहजतेने ६-३ असा जिंकला. पण हा पहिला सेट गमावणाऱ्या मिलमनने हार मानली नाही. दुसऱ्या सेटमध्ये त्याने चांगले पुनरागमन केले. या सेटमध्ये रॉजर फेडररला चांगली सर्विस करता आली नाही. याचा फायदा घेत मिलमनने हा सेट ७-५ असा जिंकला. तर तिसऱ्या सेटमध्येही काहीसे असेच चित्र होते. चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगला खेळ केला. दोघांनीही प्रतिस्पर्धीला आपली सर्विस मोडू दिली नाही. त्यामुळे हा सेट टाय-ब्रेकरमध्ये गेला. ज्यात (७-३) अशी बाजी मारत मिलमनने हा सेट आणि सामनाही जिंकला.
Absolutely stunning upset as @johnhmillman defeats Federer 3-6, 7-5, 7-6, 7-6 under the lights in Arthur Ashe Stadium!
Millman’s first top ten victory lands him a spot in the QF against Djokovic…#USOpen pic.twitter.com/4DPEOJpJw7
— US Open Tennis (@usopen) September 4, 2018
- Advertisement -