घरक्रीडालिटमस टेस्टमध्ये रोहित नापास

लिटमस टेस्टमध्ये रोहित नापास

Subscribe

-आफ्रिका वि.अध्यक्षीय एकादश सामना अनिर्णित

येथे झालेला दक्षिण आफ्रिका आणि अध्यक्षीय एकादश यांच्यातील तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित राहिला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डाव 6 बाद 279 धावांवर घोषित केल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना अध्यक्षीय एकादश संघाने 8 बाद 265 धावा केल्या. परंतु,या सामन्यात भारतीय संघाचा एकदिवसीय संघातील सलामीवीर रोहित शर्माची खरी कसोटी होती. या सराव सामन्यातील रोहितची कामगिरी त्याच्या कसोटीतील सलामीसाठी महत्वाची होती.

परंतु, सामन्यातील कसोटीत प्रथमच सलामीला येण्यासाठी उत्सुक असलेल्या रोहित शर्माला सराव सामन्यात अपयश आले. रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद झाला. परंतु,अध्यक्षीय एकादश संघाककडून प्रियांक पांचाळ, सिद्धेश लाड आणि श्रीकर भरत यांनी अर्धशतकी खेळी करत सराव सामन्याचा अखेरचा दिवस गाजवला.

- Advertisement -

तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसर्‍या दिवसात कर्णधार फॅफ ड्यु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्कराम ( 100), टेंबा बवुमा ( 87) आणि वेर्नोन फिलेंडर ( 48) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिकेने 6 बाद 279 धावांवर आपला डाव घोषित केला. अध्यक्षीय संघाकडून धमेंद्रसिंग जडेजाने ( 3/66) सर्वाधिक विकेट घेतल्या. त्यानंतर सामन्याच्या आजच्या तिसर्‍या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला दुसर्‍याच षटकात धक्का बसला.

दुसर्‍या षटकाच्या दुसर्‍याच चेंडूवर रोहित खाते न उघडता माघारी परतला. फिलेंडरने त्याला क्लासेनकरवी झेलबाद केले. मयांकही 39 धावांत माघारी परतला. पण, प्रियांक ( 60), सिद्धेश ( 52*) आणि श्रीकर ( 71) यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाची पडझड थांबवली. फिलेंडरने दोन विकेट्स घेतल्या, तर फिरकीपटू केशव महाराजने 3 विकेट्स घेतल्या.

- Advertisement -

1) पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर – विशाखापट्टणम, वेळ – सकाळी 9.30 वा.

2) दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर – पुणे, वेळ – सकाळी 9.30 वा.

3) तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर – रांची, वेळ – सकाळी 9.30 वा.

* भारताचा कसोटी संघ – विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा , चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल.

* दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अ‍ॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -