घरIPL 2020IPL 2020 : आयपीएलमधले 'हे' दोन कर्णधार मोडू शकतात लाराचा विक्रम - सेहवाग

IPL 2020 : आयपीएलमधले ‘हे’ दोन कर्णधार मोडू शकतात लाराचा विक्रम – सेहवाग

Subscribe

विरेंद्र सेहवागच्या मते दोन फलंदाज ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम मोडू शकतील.   

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद ४०० धावांची खेळी केली होती. ही कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या. हा विक्रम १६ वर्षांनंतरही कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही. भारताकडून माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने दोन वेळा तीनशे धावांचा टप्पा पार केला होता. मात्र, तोसुद्धा लाराच्या विक्रमाच्या जवळपास पोहचू शकला नाही. आता सेहवागने अशा दोन खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे त्याच्या मते लाराचा विक्रम मोडू शकतील.

तर ‘तो’ नवा विक्रम करेल

सेहवाग सोशल मीडियावर त्याचा एक खास शो करतो. यामध्ये एक चाहता सेहवागला म्हणाला, ‘आम्हाला वाटले होते की लाराचा ४०० धावांचा विक्रम तुम्ही मोडाल. मात्र, तुमच्या मते असा कोणता फलंदाज आहे, जो हा विक्रम मोडू शकेल’? याचे मजेशीर उत्तर देताना सेहवागने सांगितले, ‘मलासुद्धा वाटले होते की लाराचा विक्रम मी मोडेन. मात्र, ते माझ्या नशिबात नव्हते. मला ड्रेसिंग रूममध्ये जायची घाई असायची.’ तसेच तो पुढे म्हणाला, ‘लाराचा विक्रम मोडण्याची रोहित शर्मा आणि डेविड वॉर्नर यांच्यात क्षमता आहे. रोहितने दीड दिवस चांगली फलंदाजी केली, तर तो नवा विक्रम करेल याची मला खात्री आहे.’

- Advertisement -

मागील वर्षीच नाबाद ३३५ धावांची खेळी

भारताचा सलामीवीर रोहितने आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यांत ४६.५४ च्या सरासरीने २१४१ धावा केल्या आहेत. यात सहा शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरने मागील वर्षीच पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३३५ धावांची खेळी केली होती. सध्या आयपीएल स्पर्धेत रोहित शर्मा मुंबई इंडियन्स, तर वॉर्नर सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -