Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे विक्रमी 'शतक' 

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचे विक्रमी ‘शतक’ 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने अनोखा विक्रम रचला.

Related Story

- Advertisement -

भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात २६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने नेथन लायनच्या गोलंदाजीवर षटकार लगावत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून रोहितने १०० षटकार मारले असून ही कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला षटकार २००७ टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत नेथन ब्रेकनच्या गोलंदाजीवर मारला होता. आतापर्यंत रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२४ षटकार लगावले असून क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित अव्वल स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत १०० षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन (६३ षटकार) आणि तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम (६१ षटकार) आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात २०९ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने तब्बल १६ षटकार मारले होते.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

- Advertisement -