रोहित बनला टी-२० मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा विराट कोहलीला मागे टाकत टी-२० मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

Lucknow
रोहित शर्मा
भारताचा सलामीवीर आणि विंडीजविरुद्ध कर्णधारपद भूषवत असलेला रोहित शर्माने नेहमीचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत टी-२० मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने हा विक्रम वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात केला. विराट कोहलीच्या खात्यात ६२ टी-२० सामन्यांमध्ये २१०२ धावा आहेत. या सामन्याआधी रोहित विराटच्या ११ धावा मागे होता. आपला ८६ वा टी-२० सामना खेळणाऱ्या रोहितने विंडीजचा गोलंदाज ओशेन थॉमसला डावाच्या ५ व्या षटकात षटकार लगावत हा विक्रम केला.

मार्टिन गप्टिलच्या नावावर सर्वाधिक धावा

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर सर्वाधिक २२७१ धावा आहेत. त्याने या धावा ७५ सामन्यांमध्ये केल्या आहे. रोहित शर्माने आपल्या टी-२० कारकिर्दीत ८६ सामन्यांमध्ये ३३.८९ च्या सरासरीने २२०३ धावा केल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here