घरक्रीडाIND vs AUS : हिटमॅन इज बॅक; ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत रोहितचे पुनरागमन

IND vs AUS : हिटमॅन इज बॅक; ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत रोहितचे पुनरागमन

Subscribe

कसोटी संघाचे उपकर्णधारपद भूषवण्याची ही रोहितची पहिलीच वेळ असेल.

मागील दहा दिवस अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघासाठी चढ-उतारांनी भरलेले होते. मेलबर्न कसोटीत अनपेक्षित पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली. मात्र, त्यानंतर भारताच्या पाच खेळाडूंनी जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याची बरीच चर्चा झाली. परंतु, आता हा वाद मागे सारत गुरुवारपासून सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत चांगला खेळ करण्याचे भारताचे लक्ष्य असेल. पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणारा सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यात भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ अनुभवी खेळाडूंच्या शोधात होता. अशातच रोहितचा संघात समावेश झाल्याने भारताची ताकद वाढलेली दिसेल. रोहित कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत सलामीवीर म्हणून खेळताना उपकर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडेल. परदेशात सलामीवीर म्हणून खेळण्याची आणि कसोटी संघाचे उपकर्णधारपद भूषवण्याची ही रोहितची पहिलीच वेळ असेल. मेलबर्नमधील विजयाची पुनरावृत्ती करत सिडनी कसोटीत बाजी मारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. हा सामना जिंकल्यास रहाणेचा भारतीय संघ चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवेल. तसेच या विजयामुळे भारतीय संघ बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखणार हेसुद्धा निश्चित होईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -