घरक्रीडातिसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड; भारताला आणखी ३०९ धावांचे लक्ष्य

तिसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड; भारताला आणखी ३०९ धावांचे लक्ष्य

Subscribe

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामना अतिशय रंगतदार स्थितीत आला असून भारताला विजयासाठी ३०९ धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामना अतिशय रंगतदार स्थितीत आला आहे. तर भारताला विजयासाठी ३०९ धावांची गरज असून भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली आहे. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठं आव्हान दिलं आहे. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा बळी गमावला आहे. तर सामन्याच्या उवर्रित एका दिवसाच्या खेळात विजयासाठी भारताला ३०९ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ८ बळींचाी आवश्यकता आहे.

- Advertisement -

सिडनीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर हल्लाबोल करून दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी ४०७ धावांचं मोठं आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. तर ७१ धावांच्या भागीदारीनंतर गिल ३१ धावांवर बाद झाला. तर रोहितने दमदार खेळी करत वर्षातील पहिले अर्धशतक झळकावत ५२ धावांच्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारी (९) आणि अजिंक्य रहाणे (४) या दोघांनी खेळपट्टीवर तग धरला. हेजलवूड आणि कमिन्सने १-१ बळी टिपला.

- Advertisement -

हेही वाचा – न्यूझीलंडची ‘विल’पॉवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -