घरक्रीडाधोनीच्या 'त्या' प्रेरणेने द्विशतक ठोकलं, रोहित शर्माचा खुलासा

धोनीच्या ‘त्या’ प्रेरणेने द्विशतक ठोकलं, रोहित शर्माचा खुलासा

Subscribe

रोहित शर्माने द्विशतक मारण्यात धोनीची महत्त्वाची भूमिका होती, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन द्विशतकं ठोकली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावलं होतं. त्यावेळी संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला द्विशतक करण्यास कसं प्रेरित केलं याचा उलगडा केला. धोनीच्या त्या प्रेरणेमुळे तो हे करू शकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या द्विशतकानंतर त्याने पुन्हा आणखी दोन द्विशतकं ठोकली आहेत.

रोहित शर्माने इंस्टाग्रामवर आर अश्विनशी चॅट दरम्यान पहिले पहिलं द्विशतक आठवण करत धोनीनेही यात मोठी भूमिका बजावल्याचं तो म्हणाला. रोहित म्हणाला की, धोनीने डाव संपेपर्यंत टिकून राहा असा आग्रह धरला आणि दुहेरी शतक झळकावण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घे, असं धोनीने सांगितलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याने शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्याबरोबर चांगली भागीदारी केली होती, परंतु त्याने धोनीबरोबर ३८ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली जी सर्वात महत्त्वाची ठरली.

- Advertisement -

रोहित शर्मा म्हणाला की, एकदिवसीय सामन्यांमध्ये मी कधीही द्विशतक ठोकेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला चांगली फलंदाजी करायची होती आणि नंतर थोडासा पाऊस पडला. खेळ सुरू होताच शिखर आणि विराट लवकर बाद झाला. त्यानंतर मी सुरेश रैनाबरोबर चांगली भागीदारी केली. जेव्हा रैना बाद झाला तेव्हा युवी आला मात्र तो फार काळ टिकू शकला नाही.

 

View this post on Instagram

 

#reminiscewithash of the great series decider against the Ausies at Bengaluru in 2013 and of course the glorious 209 from Rohit.

- Advertisement -

A post shared by Stay Indoors India ?? (@rashwin99) on


हेही वाचा – कोरोनामुळे क्रिकेटमधील ‘ही’ पद्धत बंद होणार!


रोहित म्हणाला की या सामन्यात मी ४८ व्या षटकांपर्यंत धोनीबरोबर फलंदाजी केली आणि या दरम्यान त्याने मला प्रेरणा दिली. त्याने मला सांगितलं की मी जोखीम घेईन, तु सेट फलंदाज आहेस आणि संपूर्ण ५० षटकं तु खेळावीस अशी माझी इच्छा आहे. त्याने मला केवळ प्रेरणाच दिली नाही तर हे द्विशतक पूर्ण करण्यास मदत केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -