घरक्रीडाIND vs AUS : रोहित सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करेल; रहाणेला विश्वास

IND vs AUS : रोहित सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करेल; रहाणेला विश्वास

Subscribe

कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात सलामीवीर म्हणून खेळण्याची रोहितची ही पहिलीच वेळ असणार आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. रोहित या कसोटीत शुभमन गिलच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात करेल. कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात सलामीवीर म्हणून खेळण्याची रोहितची ही पहिलीच वेळ असणार आहे. रोहित २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा कसोटीत सलामीला खेळला होता. त्याने चार डावांमध्ये दोन शतके आणि एक द्विशतक झळकावले होते. हे सामने भारतातच झाले होते. परंतु, रोहित परदेशातही सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी करेल याची भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला खात्री आहे.

रोहितचे संघात पुनरागमन झाल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्याचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहोत. रोहितच्या अनुभवाचा आम्हाला खूप फायदा होईल. तो मागील काही काळ क्रिकेट खेळला नसला तरी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत आहे. त्याने ७-८ सराव सत्रांमध्ये भाग घेतला. तसेच मेलबर्नमध्ये संघात दाखल झाल्यावरही त्याने लगेच सिडनी कसोटीच्या तयारीला सुरुवात केली. रोहितने मागील काही कसोटी मालिकांमध्ये सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. सिडनी कसोटीतही तो सलामीला येईल आणि चांगली कामगिरी करेल, असे रहाणे म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -