घरक्रीडाऑस्ट्रेलियात कसोटी खेळताना रोहित नक्कीच यशस्वी होईल - हसी

ऑस्ट्रेलियात कसोटी खेळताना रोहित नक्कीच यशस्वी होईल – हसी

Subscribe

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेट खेळताना यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता आणि मानसिकता रोहित शर्मामध्ये नक्कीच आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी म्हणाला.

ऑस्ट्रेलियन वातावरणात खेळणे हे कोणत्याही फलंदाजासाठी आव्हान असते. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेट खेळताना यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता आणि मानसिकता रोहित शर्मामध्ये नक्कीच आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी म्हणाला. भारतीय संघ यावर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून चार सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. मागील सहा-सात वर्षे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रोहितला कसोटीत मधल्या फळीत खेळताना फारसे यश मिळत नव्हते. मात्र, मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला कसोटीत पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने तीन शतके लगावत या संधीचे सोने केले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही चांगली कामगिरी करण्यास रोहित उत्सुक असेल असे हसीला वाटते.

तो ऑस्ट्रेलियात चांगल्या कामगिरीस उत्सुक असेल

ऑस्ट्रेलियन वातावरणात खेळणे हे जगातील कोणत्याही फलंदाजासाठी आव्हान असते. परंतु, एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित बरीच वर्षे सलामीवीराची भूमिका पार पाडत आहे. तसेच आता कसोटीतही सलामीवीर म्हणून खेळताना त्याला थोडे यश मिळाले आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असणार. तो ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळताना यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता आणि मानसिकता रोहितमध्ये नक्कीच आहे. तो ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी जुळवून घेईल यात शंका नाही. ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. ते त्यांच्या वेगाने आणि उसळीने फलंदाजांना अडचणीत टाकतात. परंतु, रोहित त्यांचा नेटाने सामना करेल याची मला खात्री आहे, असे हसी म्हणाला.

- Advertisement -

भारताला सर्वोत्तम खेळच करावा लागेल

भारताने मागील वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळले नव्हते. परंतु, आता या दोघांचे पुनरागमन झाल्याने यंदाची मालिका जिंकण्यासाठी भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागेल असे माईक हसीला वाटते. स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ आता मजबूत झाला आहे. मागील मालिकेत या दोघांच्या अनुपस्थितीत इतरांना चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु, आता या इतर खेळाडूंच्या गाठीशी जास्त अनुभव आहे. त्यातच कमिन्स, स्टार्क, हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन आणि नेथन लायन यांसारखे उत्कृष्ट गोलंदाज असल्याने ऑस्ट्रेलियाला आता पराभूत करणे सोपे नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर हरवण्यासाठी भारताला सर्वोत्तम खेळच करावा लागेल, असे हसीने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -