घरIPL 2020IPL 2020 : रोहित शर्माच्या सल्ल्याचा झाला फायदा - सूर्यकुमार यादव

IPL 2020 : रोहित शर्माच्या सल्ल्याचा झाला फायदा – सूर्यकुमार यादव

Subscribe

'आता नाही, तर कधीच नाही,' असा विचार करून सूर्यकुमार फलंदाजी करतो.

वेगवान गोलंदाजाने टाकलेला बाऊंसर डोक्याला लागल्यानंतर पुढच्याच चेंडूवर गुडघ्यावर बसून ‘रिव्हर्स स्कुप’चा फटका मारणारे फलंदाज आपल्याला फार पाहायला मिळत नाहीत. मात्र, मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने हे करून दाखवले, तेही १५० हून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या जोफ्रा आर्चरविरुद्ध. ‘आता नाही, तर कधीच नाही,’ असा विचार करून सूर्यकुमार फलंदाजी करतो आणि यामुळेच त्याला यश मिळत असल्याचे त्याने स्वतः सांगितले. तसेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या सल्ल्यांचाही त्याला फायदा होत आहे.

रोहितकडून शिकायला मिळते

तो चेंडू माझ्या हेल्मेटला लागल्यावर, जणू माझा मेंदू बदलला असे काहीसे मला वाटले. मात्र, हा गमतीचा भाग झाला. अगदी खरे सांगायचे तर हार्दिक पांड्या दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत होता. मला चेंडू लागल्यावर तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, ‘हीच वेळ आहे. आपण थोड्या वेगळ्याप्रकारे फलंदाजी करूया.’ हार्दिक अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे आर्चर पुढचा चेंडू कसा टाकेल? हे मी त्याला विचारले. आर्चर पुढचा चेंडू यॉर्कर टाकेल असे त्याला वाटले. त्यामुळे मी यॉर्कर खेळण्यासाठी तयार होतो. लॉकडाऊनच्या काळात मी घरी रिव्हर्स स्कुप मारण्याचा बराच सराव केला होतो. त्यामुळे तो फटका मरताना मला फार विचार करावा लागत नाही, असे सूर्यकुमार म्हणाला. मी सध्या चांगली फलंदाजी करत आहे आणि याचे श्रेय रोहित भाईलाही जाते. त्याच्या सल्ल्याचा मला नेहमीच फायदा झाला आहे. त्याच्याशी चर्चा केल्यावर मला काहीतरी नवे शिकायला मिळते, असेही सूर्यकुमारने नमूद केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -