घरक्रीडाजिंदगी बडी होनी चाहिये - सचिन तेंडुलकर

जिंदगी बडी होनी चाहिये – सचिन तेंडुलकर

Subscribe

सचिन तेंडुलकरने २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना ट्वीटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

मुंबईवर २६/११/२००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काल १० वर्ष पूर्ण झाली. १० वर्षांपूर्वी झालेल्या या भ्याड हल्ल्याविषयी पंतप्रधानांपासून ते बॉलीवूडच्या अभिनेत्यापर्यंत सर्वांनीच आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या. क्रिकेट जगतातूनही २६/११ च्या हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या. क्रिकेट जगतातील देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्वीटरवरुन याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. सचिन तेंडुलकरने २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांनी ट्वीटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्याने मुंबईच्या ताज हॉटेलचा एक फोटोही शेअर केला. या फोटोखाली सचिनने एक भावूक कमेंटही लिहीली आहे. ‘लाईफ सिर्फ लंबी नही, बडी होनी चाहिये’ असा संदेश त्याने ट्वीटरवरुन दिला आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना सचिनने लिहीलंय की, #MumbaiTerrorAttack मध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी आपला जीव गमावणारे सर्व शूर-वीरांसाठी ही कमेंट तंतोतंत लागू होते. त्या सर्व शहीदांनी हे सिद्ध केलं की आयुष्यात आपल्या पुढे काय येणार आहे, याने काही फरक पडत नाही पण आपण सगळ्यांनी आतंकवादाविरोधात एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे.

सचिन तेंडुलकरने केलेलं हे भावनिक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहे. देशभरातील हजारो लोकांनी या ट्वीटला पसंती दर्शवली असून, अनेकांनी ते रिट्वीटही केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून मास्टर ब्लास्टरने पुन्हा एकदा देशाप्रतीची आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे. याआधीही वेळोवेळी सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

 


सेहवागने ओंबळेंना वाहिली श्रद्धांजली

सचिन तेंडुलकर शिवाय माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने २६/११ च्या हल्ल्याविषयी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सेहवागने ट्वीटरवरुन शहीद तुकाराम ओंबळे यांचा फोटो शेअर करत, त्यांच्यासारख्या महान व्यक्तीचा आम्हाला अभिमान आहे असं सेहवागने लिहीलं आहे. याशिवाय त्याने दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अन्य जवानांनाही श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -


पाहा; १० वर्षांनतर काय म्हणाले मुंबईकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -