घरक्रीडासलग २१ मेडन ओव्हर टाकणारे विश्वविक्रमी बापू नाडकर्णींचे निधन

सलग २१ मेडन ओव्हर टाकणारे विश्वविक्रमी बापू नाडकर्णींचे निधन

Subscribe

आपल्या फिरकीने जगभरातील फलंदाजांना गोंधळात टाकणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे निधन

भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. मुंबई येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डाव्या हाताने स्विंग करणारे नाडकर्णी हे फलंदाजांना चकवा देणारे गोलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. १९६४ साली सगल २१ ओव्हर मेडन टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी केलेला आहे. किक्रेटमध्ये शिस्तबद्धतेला खूप महत्त्व आहे, याबाबतीत बापू नाडकर्णी हे सर्वांचा आदर्श ठरतात. नाडकर्णी यांच्या निधनानंतर आयसीसी बोर्ड, क्रिकेटपटू, राजकारणी अशा सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाडकर्णी यांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मी बापू नाडकर्णी यांचे रेकॉर्ड ऐकत मोठा झालो, असे तेंडुलकरने म्हटले आहे. तर राज ठाकरे यांनी बापू नाडकर्णींनी यांनी ५६ वर्षांपूर्वी केलेल्या विक्रमाची आठवण काढून या ज्येष्ठ क्रिकेटपटूला अभिवादन केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

नाडकर्णी यांनी १९९५५ ते १९६८ असे १३ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटला योगदान दिले. ४१ टेस्ट खेळत त्यांनी ८८ विकेट घेतलेल्या आहेत. नाडकर्णी यांची सर्वोत्तम कामगिरी १९६४-६५ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथील सामन्यात पाहायला मिळाली. त्यांनी १२२ धावा देऊन ११ विकेट मिळवल्या होत्या. १९६४ साली मद्रास येथे इंग्लंड विरुद्ध खेळत असताना त्यांनी सगल २१ ओव्हर मेडन टाकल्या होत्या. हा विश्वविक्रम अद्याप कुणीही मोडलेला नाही. या सामन्यात नाडकर्णी यांनी एकूण ३२ ओव्हर टाकल्या होत्या, त्यापैकी २७ मेडन ओव्हर होत्या. तर केवळ ५ रन्स दिले होते.

नाडकर्णी यांच्या गोलंदाजीची इकॉनॉमी देखील कमाल आहे. त्यांनी १.६७ सरासरानी प्रति ओव्हर धावा दिलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते दुसरे सर्वात कमी इकॉनॉमी असलेले गोलंदाज आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही नाडकर्णी यांनी आपल्या फिरकीची जादू दाखवली होती. १९१ सामन्यात त्यांनी ५०० विकेटस घेतल्या होत्या आणि इकॉनॉमी होती १.६४, म्हणजे टेस्ट क्रिकेटपेक्षाही कमी. नाडकर्णी हे फक्त उत्तम गोलंदाजच नव्हते तर त्यांनी फलंदाजीतही चांगली खेळी केली होती. त्यांचा बॅटिंग एव्हरेज २५.७० इतका होता. त्यांनी ७ अर्धशतके तर एकदा नाबाद शतक ठोकलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -