घरक्रीडासायना नेहवाल पहिल्याच फेरीत गारद

सायना नेहवाल पहिल्याच फेरीत गारद

Subscribe

हॉंगकॉंग ओपन स्पर्धेत सायना नेहवालला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, विश्व विजेती पी. व्ही. सिंधू आणि प्रणॉय यांनी या स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला हॉंगकॉंग ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच पुरुषांमध्ये समीर वर्माही पराभूत झाला. विश्व विजेती पी. व्ही. सिंधू आणि प्रणॉय यांनी मात्र या स्पर्धेची विजयी सुरुवात केली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सहाव्या सीडेड सिंधूने कोरियाच्या किम गा इयूनने २१-१५, २१-१६ असे पराभूत केले. यावर्षीच जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या सिंधूचा दुसऱ्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानशी सामना होईल. सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतील सामना जिंकता आला नाही.


हेही वाचा – कुठेही खेळा, यश कामगिरीवरच मिळतं – विराट कोहली

- Advertisement -

सायनाचा चीनच्या काय यान यानने केला १३-२१, २०-२२ असा पराभव 

आठव्या सीडेडने सायनाचा चीनच्या काय यान यानने १३-२१, २०-२२ असा पराभव केला. मागील आठवड्यात झालेल्या चीन ओपनमध्येही यान यानने सायनाला स्पर्धेबाहेर केले होते. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानावर असणाऱ्या समीर वर्मावर चिनी तैपेईच्या वॉन्ग झू वेने ११-२१, २१-१३, ८-२१ असा विजय मिळवला. कोणत्याही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत होण्याची ही समीरची सलग तिसरी वेळ होती. प्रणॉयने चीनच्या झियांगला २१-१७, २१-१७ असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -