Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Thailand Open : सायना नेहवाल स्पर्धेतून आऊट; श्रीकांतची माघार 

Thailand Open : सायना नेहवाल स्पर्धेतून आऊट; श्रीकांतची माघार 

किदाम्बी श्रीकांतच्या पायाला दुखापत झाली. 

Related Story

- Advertisement -

भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांचे थायलंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सायनावर दुसऱ्या फेरीच्या सामन्यात थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानने मात केली. तर श्रीकांतला पायाच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. ‘पायाच्या दुखापतीमुळे मला थायलंड ओपनमधून माघार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील आठवड्यात पुन्हा थायलंडमध्ये आणखी एक स्पर्धा होणार असून तोपर्यंत मी फिट होईल अशी आशा आहे,’ अशी माहिती श्रीकांतने ट्विटरवरून दिली.

सायनाला महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. सायनावर थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानने २३-२१, १४-२१, १६-२१ अशी मात केली. या सामन्याचा पहिला गेम जिंकण्यात सायनाला यश आले होते. परंतु, दुसरा गेम तिने १४-२१ असा गमावला. तिसऱ्या गेममध्ये सायनाने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुसाननने योग्य वेळी तिचा खेळ उंचावत हा गेम २१-१६ असा जिंकला आणि स्पर्धेत आगेकूच केली.

- Advertisement -

थायलंड ओपनच्या पुरुष दुहेरीत भारताची जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना दुसऱ्या सीडेड मोहम्मद एहसान आणि हेंद्रा सेतियावान या जोडीने १९-२१, १७-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो, असे सामन्यानंतर चिराग म्हणाला.

- Advertisement -