घरक्रीडाकोरोना चाचणीचा घोळ; सायना नेहवाल थायलंड ओपनमध्ये खेळणार  

कोरोना चाचणीचा घोळ; सायना नेहवाल थायलंड ओपनमध्ये खेळणार  

Subscribe

सायना आणि प्रणॉय यांना थायलंड ओपनमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे.  

सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय या भारतीय बॅडमिंटनपटूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने या दोघांना थायलंड ओपन स्पर्धेला मुकावे लागणार असे मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ‘मला अजून कोरोनाचा अहवाल मिळालेला नाही. मला कोरोनाची लागण झाल्याचे केवळ सांगण्यात आले आहे,’ असे सायनाने ट्विटरवरून सांगितले. त्यानंतर सायंकाळी सायना आणि प्रणॉय या दोघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती आयोजकांनी भारतीय व्यवस्थापनाला सांगितले.

- Advertisement -

मंगळवारी भारतीय बॅडमिंटनपटूंच्या कोरोना अहवालाचा घोळ सुरु होता. अखेर सायना आणि प्रणॉय यांना थायलंड ओपनमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली असून हे दोघे बुधवारी सलामीचा सामना खेळतील. तसेच सायनाचा पती पारुपल्ली कश्यपलाही स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले होते. कश्यप हा सायनाच्या संपर्कात आल्याने त्यालाही या स्पर्धेत खेळता येणार नव्हते. मात्र, आता सायनाला स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळाल्याने कश्यपही स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -