धोनीची बायको भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांच्या डोक्यावर झाला परिणाम

New Delhi
Sakshi Dhoni quashes 'mentally unstable' rumours of MS Dhoni's retirement, later deletes tweet
धोनीची बायको भडकली; म्हणाली, लॉकडाऊनमुळे लोकांच्या डोक्यावर झाला परिणाम

सोशल मीडियावर बुधवारी #Dhoni Retires असा एक हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. मग भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं. गेल्या बऱ्याच दिवसांपासून थांबलेली ही चर्चा पुन्हा अचानक सुरू झाली. त्यामुळे या साऱ्या प्रकारावर धोनीची पत्नी साक्षी प्रचंडी भडकली. तिने या रागाच्या भरात एक ट्विट केलं. पण काही वेळाने साक्षीने ते ट्विट डिलीट केलं. ते ट्विट डिलीट करण्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

रागाच्या भरात धोनी पत्नी साक्षीने बुधवारी असं ट्विट केलं की, ‘या अफवा आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे. म्हणून असला हॅशटॅग ट्रेंड होतोय. अशा लोकांनी स्वतःच्या आयुष्यात लक्ष द्याव.’ साक्षीच्या या ट्विट नंतर अनेकांनी तिला शांत राहण्याच्या सल्ला दिला. तसेच धोनीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देखील दिल्या.

९ जुलै रोजी झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनकडून भारताचा पराभव झाल्यापासून धोनी कोणत्याही सामन्यात खेळलेला नाही. धोनीला बीसीसीआयच्या करार यादीतून वगळण्यात आले. मात्र धोनीचे चाहते त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी आतुरतेने वाढ पाहत होते. २०२० मध्ये धोनी आयपीएलच्या माध्यमातून भारतील संघात पुनरागमन करेल अशा चर्चा रंगल्या. पण दुदैवाने कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आली.


हेही वाचा – धोनीला बिर्याणी न दिल्यामुळे ‘या’ खेळाडूने गमावले भारतीय संघातील स्थान!