घरक्रीडाVideo : लॉकडाऊनमुळे ७ महिन्यांनंतर झाली 'या' प्रसिध्द खेळाडू पती- पत्नीची भेट!

Video : लॉकडाऊनमुळे ७ महिन्यांनंतर झाली ‘या’ प्रसिध्द खेळाडू पती- पत्नीची भेट!

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला. भारताची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांना देखील लॉकडाऊनचा सामना करावा लागला. हे दोघही लॉकडाऊनमुळे आपापल्या देशांमध्ये अडकले होते. या आधी शोएब इंग्लंड दौऱ्यावर होता. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी शोएबने पत्नी सानिया आणि मुलगा इझहानची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.

- Advertisement -

पण गेल्या काही महिन्यांपासून अनेक देशांमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही आता सुरू करण्यात आली आहे. यामुळे या पती- पत्नीची तब्बल ७ महिन्यांनंतर भेट झाली आहे.

हैदराबादमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहत असलेल्या सानिया मिर्झाने यावेळी विशेष परवानगी काढून आपला मुलगा इझानसोबत दुबईला जात आपला पती शोएबची भेट घेतली आहे. शोएब मलिकने आपल्या मुलासोबत भेटीचा  व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

१२ एप्रिल २०१० रोजी सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह झाला होता. सध्या त्यांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे ते दोघेही त्याचा आनंद घेत आहेत. माजी डबल्स वर्ल्ड नंबर १ सानिया मिर्झा ही ऑक्टोबर २०१७ पासून टेनिस पासून दूर होती. सहा ग्रँड स्लॅम दुहेरी स्पर्धांचे विजेतेपद तिने मिळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -