घरक्रीडाभारताच्या संजीवनी जाधवला कांस्यपदक

भारताच्या संजीवनी जाधवला कांस्यपदक

Subscribe

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप

भारताच्या संजीवनी जाधवने आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. तिने या स्पर्धेच्या १०००० मी. धावण्याच्या शर्यतीत ३२ मिनिटे आणि ४४.९५ सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत संजीवनीने चौथा क्रमांक मिळवला होता.

या स्पर्धेतील १०००० मीटर धावण्याच्या शर्यतीत बहारीनच्या शिताये इशेतेने ३१ मिनिटे आणि १५.६२ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या निया हितोमीने रौप्यपदक पटकावले. संजीवनी ही नाशिकच्या एकलव्य अ‍ॅथलेटिक्स अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये धावण्याचा सराव करते.

- Advertisement -

भारताला अजून एक रौप्य

भारताच्या संघाने ४X४०० मीटर मिश्र धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. मोहंमद अनस याहिया, एमए पूवम्मा, व्हीके विस्मया आणि अरोकीया राजीव यांनी मिळून ३ मिनिटे आणि १६.४७ सेकंद अशी वेळ नोंदवत हे रौप्यपदक मिळवले. बहारीनच्या संघाने या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. हिमा दासने पाठीच्या दुखण्यामुळे या शर्यतीत भाग घेतला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -