ठाण्याचा सौरभ शेट्टी ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’

Mumbai

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन, महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत ज्युनियर महाराष्ट्र श्री २०२०चा किताब ठाण्याच्या सौरभ शेट्टीने पटकावला. मुंबईची श्रद्धा ढोके मिस महाराष्ट्र ठरली.

सिन्नरच्या आडवा फाटा भागातील वंजारी मैदानावर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. ज्युनियर महाराष्ट्र श्री स्पर्धा एकूण सहा गटात पार पडली. यात सौरभ शेट्टीने बाजी मारली. तसेच मास्टर्स, दिव्यांग आणि मिस महाराष्ट्र स्पर्धाही शरीरसौष्ठवपटूंसाठी आकर्षण ठरल्या.

या स्पर्धेला राजाभाऊ वाजे यांसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, एशियन बॉडीबिल्डर्सचे सचिव चेतन पाठारे, महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशनचे अध्यक्ष प्रशांत आपटे, सचिव विक्रम रोटे, खजिनदार शरद मारने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरीरसौष्ठव क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल संघटनेचे जिल्हा खजिनदार रवींद्र वर्पे यांचा माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि विजय करंजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, शहरप्रमुख गौरव घरटे, कार्यालयीन प्रमुख पिराजीपवार, विजय कटके यांसह नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी आणि सभासदांच्या प्रयत्नांमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.

ज्युनियर श्री विविध गटांचे निकाल –
५५ किलो : १) प्रशांत सडेकर, २) सुमित शडगे, ३) शुभम कुंभार
६० किलो : १) प्रितेश गमरे, २) निमिश निकम, ३) अंकित केदारी
६५ किलो : १) वैभव जाधव, २) प्रतिक ठाकूर, ३), अजिंक्य पाटील
७० किलो : १) ऋषिकेश कोसरकर, २) निखिल राणे, ३) मयुर शिंदे
७५ किलो : १) खुषल सिंग, २) प्रफुल्ल पारीख, ३) अविनाश फटांगडे
८० किलो : १) सौरभ शेट्टी, २) अंकित देशमुख, ३) विठ्ठल तरडे

ज्युनियर श्री : सौरभ शेट्टी (ठाणे)

मास्टर्स विजेते – ४०-५० वयोगट : मोहम्मद शब्बीर शेख (मुंबई उपनगर), ५०-६० वयोगट : गणेश देवाडीगा (ठाणे), ६० वर्षांवरील: हरून सिद्दिक (बीड)

मिस महाराष्ट्र – १) श्रद्धा ढोके (मुंबई), २) अंजली पिल्ले (ठाणे), ३) मयुरी बोटे (ठाणे)

दिव्यांग गट – ६५ किलो खालील : सुदिश शेट्टी (मुंबई उपनगर), ६५ किलो वरील : दिनेश चव्हाण (ठाणे)