घरक्रीडाशालेय बुध्दिबळ स्पर्धा

शालेय बुध्दिबळ स्पर्धा

Subscribe

सब-ज्युनियर बुध्दिबळपटू चैतन्य अल्लेने निर्णायक साखळी सामन्यात तनय झव्हेरीची विजयी दौड रोखून सर्वाधिक ३.५ गुण घेतले आणि शालेय जलद बुध्दिबळ स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले.

शिवनेर आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सावतामाळी भुवन ट्रस्ट व मुंबई शहर बुध्दिबळ संघटना यांच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेच्या ११ वर्षांखालील गटात पार्थ छेडाने, ९ वर्षांखालील गटात पुण्याच्या शर्विन बडवेने तर ७ वर्षांखालील गटात विहान गांधीने अजिंक्यपद मिळवले.

- Advertisement -

सावतामाळी सभागृह-भायखळा येथे झालेल्या या शालेय बुध्दिबळ स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात चैतन्य अल्लेने ३.५ गुणांसह पहिला, तनय झव्हेरीने ३ गुणांसह दुसरा आणि वेदांत सावंतने २.५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. ११ वर्षांखालील गटात पार्थ छेडाने ४ गुण मिळवत पहिला, दक्शील काजरोळकरने ३ गुण मिळवत दुसरा तर विहान पटेलने २ गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह ४७ खेळाडू सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -